व्रतविधि – भाषाड शु० १ पासून या प्रतिकांनी चाषপুর होऊन अंगावर दृढभौत बजे भारण करावीव. सर्व पूजाद्रम्बे हातौं
घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि-पूर्वक जिनेंद्रास मक्ताने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख यक्ष व चक्रेश्वरी यक्षोसर स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा अष्टद्रव्यांनीं त्यांचो अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथतीर्थंकराय गोमुख यक्ष चक्रेश्वरीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हो व्रतकथा वाचावी. नंतर एक पान लावून महार्थ करून त्याने ओवाळोत मांदरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. सत्पात्रांत आहारदान द्यायें.
याप्रमाणे प्रतिदिवशीं पूचाक्रम करून एका वस्तूचा त्याग करावा. असे चार महिने करावे. ब्रम्हचर्य पूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. शेवटीं कार्तिक अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं आदिनाथ विधान अथवा भक्तामर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावींत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
मर नामक एक्का नगरांत मर्माणमाली या नांवाचा एक पराक्रमी गुणवान् व धर्मशोल अत्ता राजा राज्य करीत होता. त्यानें है व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधी पाळिले. त्यामुळे त्यानें पुत्र पौत्रादे व धन-धान्यादि भोगोपभोगाचा अनुभव घेतला, आणि विरक्त बनून जिनदीक्षा घेतली, घोरतपश्चरण करून तो धर्मोपदेश देत विहार करू लागला.
एकदां उज्जयनी नगराच्या स्मशानभूपीमध्ये रात्रीं प्रतिमायोग धारण करून मुनिराज बसले होते. तेव्हां एक वेताळ साधक मांत्रिक अंजनविधि साधन करीत असतां त्यानें त्या मुनिराजांच्या मस्तकीं अग्नि प्रज्वलित करून लाविला होता. पुढें भीतीनें तो मांत्रिक भिवून पळाला. मग प्रभातीं सूर्योदयकालीं त्या नगरांतील जिनदत्त श्रेष्ठी ही मुनीचो वार्ता ऐकून तेथे आला. मुनींची अवस्था पाहून त्यांनीं तुकारीच्या गृहांतील लक्षमुळीचे तेल आणून लावून त्यांचे दुःख दूर केले आणि त्यांना अभयदान दिलें. या पुण्यफलानें श्रेष्ठी सद्गतीस गेला. मुनिराज सुगतीस गेले असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चऊना राणो यांचीच कथा येथे घ्यावी.