व्रतविधि-कायगुप्ति व्रतविधिप्रमाणेच करावें फक्त आदिनाथ तीर्थंकरांच्या ऐवजी अजितनाथ तीर्थकरांची आराधना करावयाची आहे. मंत्र जाप्य – ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अजितनाथतीर्थंकराय महायक्ष-रोहिणीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ महार्थ्याला दोन पाने लावणे.
– कथा –
पूर्वी भूतिलक नांवाच्या नगरांत प्रजापाल नांवाचा धर्मनिष्ठ राजा नीताने सपरिवार राज्य करीत होता. त्याने हे व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळिले होते. पुढे त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्यानें जिनदीक्षा घेतली. उग्र तपश्चरण केलें, आपली वचनगुप्ति उत्तम रोतीनें पाळिली. त्यामुळे त्याला स्वर्ग व क्रमाने अपवर्ग प्राप्त झाले. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक राजा व चलना राणी यांचीच कथा येथे घ्यावी,