व्रतविधि-आषाढ शु. ३ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. ४ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतवर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास बावे, मंदिरास तोन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोवीस तोयेकर प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. देवापुढे एका पाटावर चार स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने अक्षतां, फलें, फुले वगैरे पुढील मंत्र उच्चारीत ठेवावे.
हे चार मंगल मंत्र आहेत. यांचे अर्चन करावे. चार प्रकारचे चार चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चतुर्विंशतितीर्थंकरेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा, ही व्रतकथा वाचावो. एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करावा. सत्पात्रांस आहारदान करून ब्रम्हचर्य पूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा दुसरे दिवशीं दान पूजा करून पारणे करावे.
याप्रमाणें चार महिने प्रतिमासीं शुद्ध व कृष्ण पक्षांत त्याच तिथीस पूजाक्रम करावा. शेवटीं कार्तिक आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं चोवीसतीर्थंकरविधान अथवा एकाद्या तीर्थकरांचे विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चारी दानें द्यावीत. चार वेळवांच्या करंड्यांत वायनें – चार प्रकारची फळे, तिळगूळ, शिजविलेले हरभरे, केळो, (तंबीट्दु) गुळपापळ, वैगैरे वस्तू घालून – श्रांधावींत, देव-शास्त्र-गुरु यापुढे ठवून आपण एक घेऊन जावें. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
पूर्वी हे व्रत भवांतरीं भरत व शत्रुघ्न्न यांनीं गुरुजवळ घेऊन केले होतें. म्हणून ते दशरथनंदन होऊन जन्मले आणि शेवटीं स्वर्गात जाऊन तेथे चिरकाल दिव्यपुख भोगूं लागले. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक-महाराजा व चलना महाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.