व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या अमां-वस्येदिवशीं या व्रतास प्रारंभ करावा. त्या दिवशीं प्रातःकाळीं या व्रति-कांनीं सुखोष्णजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवले धारण करावींत. मग सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. नंतर श्रीपाठवर श्रीचंद्रप्रभतीर्थकर प्रतिमा श्याम यक्ष ज्वालामालिनी यक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं अर्हं श्रीचंद्रप्रभतीर्थंकराय श्यामयक्ष ज्वालामालिनी यक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिन-सहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रास्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत आठपार्ने लावून त्यांच्यावर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावींत. दुसरे दिवशीं म्हणजे प्रतिपदेदिवशीं पूर्ववत् पूजा वगैरे क्रम करून एक ग्रास (एकच घास) आहार घ्यावा.
आणि द्वितीये दिवशीं पूर्ववत् पूजावौरे करून अन्नाचे दोन ग्रास घ्यावेत. तृतीये दिवशीं पूर्ववत् पूजादि करून तीन ग्रास घ्यावेत. चतुर्थी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून चार ग्रास घ्यावेत. पंचमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून पांच ग्रास खावेत. षष्ठो दिवशीं पूर्ववत् पूजादि करून सहा ग्राक्षांचा आहार घ्यावा. सप्तमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून सात आस सेवन करावेत. अष्टमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून आठ आस आहार घ्यावा. नवमी दिवशीं पूर्ववत् पूच्चादि करून नऊ ग्रास घ्यावेत. दशमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून दहा आत खावेत. एकादशी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून अकरा ग्रस आहार घ्यावा. द्वादशी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून बारा ग्रास आहार घ्यावा. त्रयो-दशीस पूर्ववत् पूजादि करून तेरा ग्राप्त ध्यावेत. चतुर्दशी दिवशी पूर्व-वत् पूजादि करून चौदा ग्रासांचा आहार घ्यावा, पौर्णिमेदिवशीं पूर्ववत् पूजादि करून उपवास करावा. नंतर पुनः कृष्णप्रतिपदे दिवशीं पूर्ववत् पूजादि करून चौदा प्रासांचा आहार घ्यावा. द्वितीये दिवशीं पूर्ववत् पूजादि करून तेरा ग्रास घ्यावेत. तृतीये दिवशीं पूर्ववत् पूजादि करून बारा ग्रास, चतुर्थी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून अकरा आस, पंचमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून दहा ग्रास, षष्ठी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून नऊ ग्रास, सप्तमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून आठ ग्रास, अष्टमी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून सात ग्रास, नत्रमी दिवशीं पूर्ववत्
पूजादि करून सहा ग्रास, दशनी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून पांच ग्रास, एकादशी दिवशी पूर्ववत् पूजादि करून चार ग्रास, द्वादशी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून तीन ग्रास, त्रयोदशी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून दोन ग्रास, चतुर्दशी दिवशीं पूर्ववत् पूजादि करून एक ग्रस आहार करावा. आणि अमावस्ये दिवशीं पूर्ववत् पूजादि करून उपवास करावा. दुसरे दिवशी पूंजा व दान करून पारणे करावे. ठीस दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे हे व्रत बारावर्षे करून शेवटी त्यांचे उद्यापन करावे. त्यावेळी श्रीचंद्रनमतीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चतुः संघास चतुर्विधदाने द्यावीत, असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा-
प्रजापाल नांवाचा एक राजा व त्याला विनयश्री नामें राणी होती. एके दिवशी शुभचंद्र मुनीश्वराच्या दर्शनास गेले वेळीं राजानें मुनीश्वरांना प्रश्न केला. तेव्हां त्यांनी याचा सर्वविधि आणि फल सांगि-तहे. हे व्रत करणा-पांचो कीर्ती बोढते. हे व्रत पूर्वी बाहुबली मुनीनीं केले त्या योगे त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ब्राम्ही व सुंदरी यांनी केले, त्या योगानं त्या स्त्रीलिंग छेडून स्वगात देव झाल्या. जंबूस्वामी वगैरे बच्याच मुनीश्वरांनीं हैं व्रत केलें व कर्मचा क्षय करून मोक्षप्राप्ति करून घेतला. है व्रत करणाऱ्याना चंद्रकिरणाप्रमाणे प्रकाशमान असे केवलज्ञान प्राप्त होते है व्रत पूर्वी यशोभद्रा नामक एका श्रेष्ठो स्त्रीनें विधिपूर्वक पालन करून उद्यापन केले होते. त्या योगानें तिला ‘ सुकुमार’ नामक सौंदर्यशाली पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि ती अंती समाधिविधिने मरण पावून स्त्रीलिंग छेडून स्वर्गात महद्धिक देत्र झाली आहे. या शिवाय अनेक सत्लुरुषांनीं है व्रत यथाविधि पाळून सद्गति सुख मिळविले आहे. असा या व्रताचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चलना महाराणी यांचीच कथा येथे ध्यात्री.