व्रतविधि– आषाढ शु. ७ दिवशीं या बतिकांनी एकमुक्ति करावी व ८ दिवशी प्रभाती शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढपीतवस्खें धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजय यक्ष, काली बक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर सात स्वस्तिके काढून त्यांवर पाने, फुले, अक्षता, फळे नैवेधे वगैरे मांडून अष्टद्रव्यांनी त्यावी अर्चना करावी. श्रुत व गणधर बांची पूजा करावी, यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. सप्तपरमस्थानांचे स्मरण करून सात अध्ये द्यावीत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं सुपार्श्वनाथाय नंदिविजययक्षकालीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हो व्रतकथा वाचाची. नंतर एका पात्रांत सात पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घाल-बावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. ऋद्धिस-पन्न मुनीश्वरांना आहारदान द्यावे. हे यांत मुख्य आहे. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत पूर्वी कच्छ व महाकच्छ वगैरे राजे लोकांनी मक्तीने गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळिलें. होते. त्यायोगे त्यांना संसारांत्र सुख मिळून अंतीं आदिनाथाच्या समवसरणांत त्यांनीं जिनदीक्षा घेतली; घोर तपश्चर्या केली. त्या व्रत-तप-बलाने सर्वक्रम (चा क्षय करून ते मोक्षास गेले आहेत. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक राजा व चलना राणी यांचीच कथा येथे घ्यावी.