व्रतविधि-मार्गशीर्ष शु. ४ दिवशीं या व्रतिकांनी एक्सुक्ति करावी. आणि ५ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधील वस्ने धारण करावीत. सर्व पूजासामश्री हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लांवावा, पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक कराया देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिकें क्रमाने काढून त्यांवर पार्ने, फुले, फले वगैरे ठेवून पंचपरमेष्ठींची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, पंचपका-नांचे पांच चरु करावेत. ॐ ह्रीं अर्हत्सिद्धाचार्योयाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी मग एका पात्रांत पांच पार्ने व त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावे.
त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा. अगर पांच वस्तूंचा नियम करून भोजन करावे. धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांत आहारादि दानें द्यावींत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे महिन्यांतून एकदशं त्याच तिथीस हे व्रतपूजन करावे. अशा ८ पूजा पूर्ण झाल्यावर नवव्या पूजेच्या वेळीं म्हणजे श्रावण शु. ५ दिवशीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचपरमेष्ठी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चारों दाने द्यावीत. पांच मुनींना पुस्तके, श्रुतवले, जपभाळा वगैरे आवश्यक वस्तू द्याव्यात. तसेब पांच आर्यि-कांनाहि द्यावे. पांच दंपतीस भोजन करवून त्यांना वस्त्र, पान, सुपारी, फळे वगैरे देऊन त्यांचा सन्मान करावा. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी द्वारावती नगरांत श्रीकृष्ण अर्धचक्रवर्तीराजे राज्य करीत होते. त्यांना सत्यभामा, रुक्मिणी वगैरे सोळा हजार स्त्रिया होत्या. त्यांत रुक्मिणी ही पट्टराणी होती. या सर्व परिवारासह ते सुखानें कालक्रमण करीत असतां, – एकदां त्या नगराच्या उद्यानांत पिहितास्त्रव नामक ज्ञानी निर्मथ भट्टारक महामुनिराज आपल्या संघा-सह येऊन उतरले. ही शुमवार्ता वनपालकाकडून राजांस कळतांच ते आपल्या परिजन आणि पुरजन यांसह पादमार्गे त्याच्या दर्शनास गेले. तेथे त्यांना तीन प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीने त्यांची पूजा, वंदना, सुति करून त्यांच्या समीप जाऊन बसले. कांहीं वेळ त्यांच्या मुखाने धर्मोपदेश श्रवण केल्यावर ती पट्टराणी रुक्मिणी आपले करयुग जोडून त्या मुनीश्वरांना म्हणाली, – हे दयासिंधो स्वामिन् ! माझ्या पोटीं पुत्र संतान नाहीं. याला उपाय काय करावा ? हे मला आपण कृपा करून सांगावे. हे तिचे नम्रवचन ऐकून ते तिला म्हणाले, हे कन्ये । तूं आतां कामदेव व्रत है यथाविधि पालन कर. म्हणजे तुला प्रद्युम्न नामक कामदेव पुत्र होईल, असे सांगून त्यांनीं तिला सर्वविधि सांगितला. है ऐकून तिला अतिशय आनंद झाला. मग तिने त्यांनावंदना करून है वन स्वीकारिलें. नंतर सर्व जन त्यांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आहे. पुढे योग्य कालीं रुक्मिणीनें है व्रत यथाविधि पाळिलें. त्यावेळों १०० मुनिसत्रास आहारदान दिले. पुढे त्या पुण्यनभावाने रुक्मिणीला प्रद्युम्न नांवाचा पुत्र झाला कालांतराने तो युवावस्थेत आल्यावर अनेक प्रकारे राजैश्वर्य मोगून तृप्त झाला. मग त्याने मगवती जिनदीक्षा धारण केली. नंतर घोरतपश्चर्या करून त्याने सर्व कर्माचा क्षय करून तो मोक्षास गेला. रुक्मिणी ही शेवटीं सन्यासविधिर्ने मृत्यु पावून स्त्रोलिंग छेडून स्वर्गात देव झाली. असा या व्रताचा दृष्टांत आहे.