व्रतविधि – पौषमासांत मकरसंक्रमण ज्या दिवशीं येईल त्याच्या पूर्व दिवशीं या ब्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि पर्वतिथो दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर नूतनधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजासामश्री हातीं बेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पोठावर शीतल-नाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वर यक्ष मानवी यक्षोसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे शुद्ध पाटावर क्रमाने १० स्वस्ति के काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फलें, फुलें, तिळगुळ मिश्रित १० लाडू व दहा कलशात दहा प्रकारची धान्ये घालून मांडावींत. नंतर वृषभादि शीतलनाथापर्यंत १० दहा तीर्थ राची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. पंचपक्वान्नांचे चरु करावेत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं शीतलनाथ तीर्थंकराय ईश्वरयक्षमानवीययक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पे घालावींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत दहा पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाये करावे. त्याने ओंवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारतो करावो. त्यादिवशी उपवास करावा. सत्या-त्रांत आहारदान द्यावे. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
याप्रमाणे महिन्यांतून एकदां त्याच तिथीस हे बापूजन करावे अशा बारा १२ पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं शीत अनाथविधान करून महाभिषेक करावा. मंदिरांत आवश्यक वस्तु ठेवाव्यात. चतुःसंघास चारी प्रकारची दानें द्यावीत. दहा दंपतीस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करावा असा याचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिक महाराज्जा आणि चलना महाराणी यांची घ्यावी.