अर्थ – १ हातांत तलवार धरून जोवन करणें, २ लेखन क्रिया करून जीवन करणे, ३ शेतकाम करून जीवन करणे, ४ दुसऱ्यांस शिक्षण देऊन जोवन करणे, ५ शिल्पकला (सुतार, लोहार, सोनार, चित्रकार) करून निर्वाह करणें, ६ व्यापार करून उदर निर्वाह करणे. (वाणिज्य) अशीं हीं सहा कर्म प्रजाजनांच्या जीवनासाठीं वृषभनाथ भगवंतांनीं युगारंभी प्रतिपादिलीं आहेत. ही कनै कारुजनांचीं आहेत; म्हणून याला कारुणी अथवा कारुण्य म्हणतात असो. ॐ हीं षट्क-र्मक्रिया चारण लोकोपदेशक श्रीवृषभदेवाय जलभित्यादि ० या मंत्राने सहा वेळां अष्टद्रव्यांनी पृथक स्या मांडलेल्या सहा पानावर अर्चना करावी. श्रुत व गणबर पूजा करून यक्ष, बक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे, ॐ नहीं श्रीं क्लीं ऐं अई पद कर्माचार णलोकोपदेशक श्रीवृषभनाथतीर्थंंकराय गोमुखयक्ष चक्रेश्वरीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुढेवे घालावीत. श्रोजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत सहा पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाये करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावो. देवापुढे नंदादीप लावावा. त्यादिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावें ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा, प्रतिपदेपासून षष्ठीरथैव पूर्ववत् पूजाक्रम करून सत्पात्रांस आहारदान देऊन सहा वस्तूंनी एकाशन करावे.