व्रतविधि-आषाढ शु. ७ दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढभौत वर्षों धारण करावींत सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिना-लयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिने-द्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर पंचपरमेष्ठीची मूर्ति स्थापन करून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढें शुद्ध पाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यावर पार्ने, अक्षता, फळे फुले वगैरे ठेवून मग अष्टद्रव्यांनीं पंचपरमेष्ठीचो अर्चना करावी. चरु करावेत. श्रुत व गणधर पूजा करून यश्क्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप असे पांच जप करावेत. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाध्य करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. याप्रमाणें पूजाक्रम नऊ दिवस करावा. एक च वस्तूने एकाशन करावे. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. पंचाणुवले, तीन गुणव्रते, चार शिक्षार्थते अशीं बारात्रते पाळावीत. क्रोधादि भावांना सोडून शुभपरिणामांत लीन व्हावे. चतुः संघास आहारदान द्यावे.
याप्रमाणे पांच आष्टान्हिकांत पूजाक्रम करून कार्तिकांष्टान्हिकांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं नूतन पंचपरमेष्ठीची प्रतिमा निर्माण करून तिची पंचकल्याणविधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. अथवा पंचपरमेष्ठीविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत असा याचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिक महाराजा व चलनामहाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.