व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि एका आष्टान्हिक्क पर्वांत अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यं-गस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावीत, सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ-शुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्ती ने साष्टांग नमस्कार करावा, पीठावर शांति-नाथ तीर्थकर प्रतिमा गरुड यक्ष महामानसी बक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं शांतिनाथ तीर्थंकराय गरुडयक्ष- महामानसीयक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्ने पाळावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां अप करावा. ही नतकथा वाचावी, नंदादीप लावावा नंतर महाय करून त्यानें ओवाळीन मंदिरास तीन पदक्षिणा पादन मंगळारती करावी. ससात्रांस आहारदान यावे. आपण एकाशन करावे, याप्रमाणे नऊ ९ दिवस पूजाकन करावा. त्यानंतर चार महिनेपर्यंत प्रतिदिनी क्षीराभिषेक करून अष्टविधार्चन करावे. णमोकार मत्राचा १०८ वेळां जप करावा, यापमाणे चार ४ महिने पूर्ण झाल्यावर शेवटी याचे उद्यापन करावे. त्यावेळी शांतिनाथविधान महाभिषेकपूर्वक करावे. चतुःसंघास चारी दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा- श्रेणिक राजा आणि चलना राणी यांचोच कथा येथे घ्यावी. +