व्रतविधि – आषाढ शुद्ध ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करात्री. आणि ५ दिवशी प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतबस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना-लयात जावे. मंदिरास तीन पदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिने-द्रात भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुमतिनाथ तीर्थकर प्रतिमा तुंबरुयक्ष पुरुषादचा यक्षोसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभि-षेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. देवापुढे नंदादीप लावून एका पाटावर पांच पार्ने मांडून त्यांवर अक्षता, फर्के, फुले, चरु वगैरे लावावेत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं सुमतिनाथ तीर्थंकराय तुंबरुयक्ष पुरुषदत्तायक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने व त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्यानें ओवाळीत्त मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. सत्पात्रांस आहारदान बावे. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. बम्हचर्य पूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. याप्रमाणे शुद्ध व कृष्ण पंचमी तिथीस पूजाक्रन करावा. शेवटीं कार्तिक आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे त्यावेत्री सुमतिनाथ तीर्थंकरविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. पांच मिथुनास (दंपतीस) भोजन करवून त्यांचा वस्त्र, फल, अक्षता, फुले इत्यादिकांनी सत्कार करावा. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा-श्रेणिक महाराजा व चलना महाराणी यांचोच कथा येथे घ्यावी.