व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. १ दिनीं एकमुक्ति आणि २ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत चार पाने लावणे, चार मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. चार मुनींना शास्त्र, जपमाळा वगैरे देणे.
– कथा-
पूर्वी सिंहपूर नगरांत सिंहसेन राजा सिंहनंदा पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना सिहोदर नामक पुत्र व सिंहमाला नाने सून होती. सिवाय सिंहविजय मंत्री व त्याची स्त्री सिंहगामिनी सिंहकीर्ति पुरोहित व त्याची भार्या सिंहसुंदरी, सिंहदत्त श्रेष्ठी त्याची पत्नि सिंहदत्ता, सिंदध्वज सेनापती आणि त्याची गृहिणी सिंहराज्ञी असा परिवार होता. त्यांनी सिंहसागर मुनीश्वरांजवळ है बत घेऊन त्याचे पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्गाचे व क्रमाने अपवर्गाचे सुख मिळाले आहे. असा दृष्टांत आहे.