व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविवि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. ९ दिनीं एकमुक्ति आणि ३ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पांच पार्ने लावणे, पांच मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनीं यांचा सन्मान करणे, पांच मुनींना शास्त्र जपमाळादि देणे.
– कथा –
पूर्वी मनोहरपूर नगरांत मनोहर राजा मनोरमा राणीसइ राज्य करीत होता. त्यांना मनोज्ञान पुत्र व त्याची पत्नि मनोधरा विजय मंत्री आणि त्याची पत्नि शांता, मनःकीर्ति पुरोहित व त्याची भायो मनोभिलाषा, मनःसागर श्रेष्ठी व त्याची गृहिणी मनोगामिनी, मनःकुंजर सेनापति व त्याची स्त्री मनोवेगा बसा त्याचा परिवार होता. एकदां उद्यानांत यांनी मनोविजय गुरुजवळ हे नत्र धारण करून त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्गाचे आणि कनाने अपवर्गाचे सौख्य पाप्त झाले आहे. असा दृष्टांत आहे.