व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक आषाढ शु. ४ दिनीं एकमुक्ति आणि ५ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत सात पार्ने लावणे, सात दंपतींना भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करणे. सात सुनींना शास्त्र, जपमाळादि देणे.
– कथा –
पूर्वी काश्मीर नगरांत कामसेन राजा कामसुंदरी राणीसह राज्य करीत होता. त्यांना कामदमन नामक पुत्र व त्याची पत्नि कामदेवी, कामशरहर प्रधान व त्याची स्त्री कामरूपिणी, काम-सुकीर्ति पुरोहित व त्याची भार्या कामक्रीडा, कामसागर श्रेष्ठी व त्याची गृहिणी कामिणी, कामशर सेनापती व त्याची स्त्री काम-चतुरी असा परिवार होता. त्यांनीं एकदां कामविजय मुनीजवळ हैं व्रत स्वीकारून त्याचे यथावत् पालन केले. त्यायोगे त्यांना स्वर्गस्थान व क्रमाने मोक्षस्थान प्राप्त झाले आहे. असा दृष्टांत आहे.