व्रतविधि–वरीलपमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. ५ दिनीं एकभुक्ति आणि ६ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पार्ने ८ लावणें, आठ मुनींना शास्त्र, जपमाळादि देणे, आठ मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे, १०८ आंब्याची फले, १०८ कमलपुष्पे, १०८ जिनचैत्यालयाची वंदना करणें.
– कथा –
पूर्वी नित्यावलोक नगरांत नित्यानंद नामक राजा नित्यसुखी राणीसह राज्य करीत होता. त्यांना नित्यनिरंजन पुत्र व त्याची पत्नि नीतिकांति तसंच नित्याचार मंत्री त्याची स्त्री नित्यावलोकिनी, नोतिकीर्ति पुरोहित आणि त्याची बायको नीतिसेना असा परिवार होता. त्यांनीं एकदां नीतिसागर गुरुजवळ हे व्रत धारण करून त्यांचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्ग व क्रमाने मोक्ष याची संपत्ति प्राप्ती झाली आहे. असा दृष्टांत आहे.