व्रतविधि- वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. ९ दिनीं एकभुक्ति १० दिवशीं उपवास, पजा वगैरे. पात्रांत बारा पार्ने लावणें, बारा मुनींना शास्त्रादि आवश्यक वस्तूं देणें, बारा दंपतीनां भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे, १०८ फले, १०८ कमलपुष्यै, १०८ जिनमंदिरांचे दर्शन करणें.पूर्वी त्रिलोकतिलकपुर नगरांत लोकपाल राजा लोकोपका-रिणी राणीसह राज्य करीत होता. त्यांना लोकहितकार नांवाचा मंत्री व त्याची स्त्री लोकसुंदरी, लोककीर्ति पुरोहित व त्याची मार्या लौकिकशीलसुंदरी तसेंच श्रेष्ठो, सेनापति इत्यादि परिवार होता. एकदां यांनी लोकसागर मुनीश्वरांजवळ हे व्रत स्त्रीकारून त्यांचे यथा-विधि पालन केले. त्यामुळे त्यांना ऐहिक व क्रमाने पारलौकिक सुख प्राप्त झाले आहे. असा याचा दृष्टांत आहे.