व्रतविधि- वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक आष.ढ शु. १० दिनों एकभुक्ति व ११ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत तेरा पार्ने लावणें, तेरा मुनींना शास्त्र, जपमाळादि देणें, तेरा मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे. १०८ आंबे, १०८ कमलपुष्पें वाहणे.
– कथा-
पूर्वी कांचीपूर नगरांत कांचीशेखर राजा कनकमालादेवी राणीसह राज्य करीत होता. त्यांना कांचनाम पुत्र व त्याची भार्या कनकसुंदरी, कनकोज्जल मंत्री व त्याची स्त्री कनकमंजरी, कन-ककीर्ति पुरोहित व त्याची पत्नि कनकभूषणी, तसेंच श्रेष्ठी, सेनापति इत्यादि परिवार होता. एकदां यांनी कनकसागर मुनीजवळ हे व्रत घेऊन त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वगर्गाचे आणि क्रमाने अपवर्गाचे सुख प्राप्त झाले आहे. अत्ता दृष्टांत आहे.