व्रतविधि-वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक–आषाढ शु. १४ दिनीं एकमुक्ति आणि १५ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पार्ने तीन मांडणे, तीन मुनींना शास्त्रादि दान देणें, तीन दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करणे, १०८ १०८ आंबे, केळी, कमलपुष्पै, जिनमंदिर दर्शन वगैरे करणे.
– कथा –
पूर्वी सुरेंद्रपूर नगरांत सुरेंद्रसेन राजा सुरसुंदरी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना सुरेंद्रकांत पुत्र व सुरकांता सून होती. शिवाय सुरे-द्रकीर्ति पुरोहित व त्याची भार्या सुरत्नभूषणा तसेच श्रेष्ठी, सेनापति, मंत्री इत्यादि परिवार जन होते. एकदां यांच्यासह राजाने सुरकीर्ति व विशालकीर्ति या चारणमुनिद्वयांजवळ है व्रत घेऊन याचे यथाविधि पालन केले. त्यायोगें ते ऐहिक अनेक सुख भोगून परंपरेने मोक्षास गेले, असा दृष्टांत आहे.