व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक आषाढ कृ. २ दिनों एकमुक्ति आणि ३ दिवशों उपवास, पूजा वगैरे आठ कराव्यात. पात्रांत पार्ने सहा मांडणे, सहा मुनींना शास्त्रादि दान देणे, सहा मिथुनांस मोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सम्मान करणे, १०८ कमलपुष्पें, आम्र फले, अर्पण करणे १०८ जिनमंदिर दर्शन करणे वगैरे.
– कथा–
पूर्वी तारापूर नगरांत तारकुमार राजा तारादेवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना तारासुर नामक पुत्र व तारामणी सून होती. शिवाय ताराविजय मंत्री त्याची मार्या तारासुंदरी तसेंच पुरोहित, श्रेष्ठो, सेनापति इत्यादि परिवारजन होते. या सर्वांसह राजा एकदां तारासागर नामक योगींद्राच्या दर्शनास गेला होता. त्यावेळीं त्याने राणीप्तह है व्रत त्यांच्याजवळ घेऊन त्याचे यथाविधि पालन केलें. त्यायोगाने ते दोघे स्त्रर्गास जाऊन परंपरेने मुक्तीस गेले आहेत. असा दृष्टांत आहे.