व्रतविधि– वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ कृ. ४ दिनीं एकभुक्ति आणि १ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. आठ पूजा झाल्यावर उद्यापन करणें, पात्रांत एक पान लावणे, एका मुनीश्व-रांस शास्त्रादि उपकरणें देणें, एका मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करणे. १०८ आम्रफले, १०८ कमलपुष्पें अर्पण करणे.
– कथा-
पूर्वी अनंतपूर नगरांत अनंतराज राजा अनंतसुंदरी राणीसह राज्य करीत होता. त्यांना अनंतकुमार पुत्र व अनंतमती मार्या होती. तसेंच अनंतविजय मंत्री व त्याची स्त्री अनंतलक्ष्मी, अनंतकीर्ति पुरोहित व त्याची पत्नि अनंतगुणी श्रेष्ठो, सेनापति इत्यादि परिवार होता. एकदा यांच्यासह अनतसेन गुरुवर्यांच्या दर्शनास राजा गेला होता. तेव्हां त्यानें राणीसह है व्रत घेऊन त्यांचे यथाविधि पालन केले. त्यायोगें ते स्त्रर्गास व परंपरेनें मुक्तीस गेले आहेत. असा दृष्टांत आहे.