व्रतविधि – वरीलप्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ कृ. ६ दिनीं एकमुक्ति आणि ७ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. आठपूजा, पात्रांत तीन पार्ने लावणे, तीन मुनींद्रांस शास्त्रादि देणें, तीन युगुलांस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्याचा सन्मान करणे, १०८ कमलपुष्पें फले अर्पण करणे, वगैरे.
-कथा-
पूर्वी जयपूर नगरांत जयसेन राजा जयावती राणीसह राज्य करीत होता. त्यांना जयकुमार पुत्र व जयसुंदरी सून, शिवाय जय-पाल मंत्री व त्याचो भार्या जयश्री तसेच पुरोहित, श्रेष्ठो, सेनापति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह राजा एकदां जयसागर मुनिरा-जांच्या दर्शनास गेला त्यावेळीं त्याच्याजवळ त्यानें राणीसह है व्रत अहण करून त्याचे पालन केले. त्यामुळे ते स्वर्गास व परंपरेने मुक्तीस गेले आहेत. असा दृष्टांत आहे.