व्रतविधि – चैत्रादि द्वादश मासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्लपक्षांतील प्रतिपदे दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यं-गस्नान करून अंगावर दृढघौतवस्त्र धारण करावीत. सर्व पूजा साहित्य करी घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर नवदेवता प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. मंडप श्रृंगार करून वरतीं चद्रोपक बांधावे. शुद्ध भूमीवर पंचवर्णानीं नवदेवता यंत्रदळ काढून त्याच्या सभोंवती चतुरस्रपंचमंडले काढावीत, आठ सुशोभित कलश व अष्टमंगल द्रव्ये ठेवून त्यांना पंचवर्णसूत्र व पांढरे वस्त्र गुंडाळावे. मध्यभागी एक सुशोभित कुंम ठेवून त्यावर एका ताटांत गंधाने नत्रदेवता यंत्र लिहून त्यांवर नऊ पार्ने अक्षता, फले, फुळे वगैरे लावून नंतर तो ठेवावा. मग ती नवदेवता प्रतिमा त्यावर स्थापावी. नंतर सकळीकरणादि नित्यपूजा-क्रम करून नवदेवताविधान वाचत क्रमाने अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. पंचपकात्नांचे चरु करावेत, ॐ हीं अई अर्हत्सिद्धाचार्योपाध्याय-सर्वसाधुजिनधर्म जिनागमजिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत नऊ ९ पार्ने त्यांवर अष्ट-द्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करात्री. त्यादिवशीं यथाशक्ति उपवा-सादिक करावें. सत्पात्रांस आहारदान द्यावे. पांच अणुबतें, तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रतें अशीं बाराव्रते पाळावीत. धर्मध्यानांत काल घालवावा. कृषी, व्यापार, उद्योग वगैरे आरंभ सोडावेत.
याप्रमाणें अष्टमी ८ पर्यंत सर्व पूजाक्रम करून नवमी ९ दिवशीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं बृहच्छांतिकाराधना करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. विशेष हे कीं, – आठ मुनिस-मूहांस आहारदान देऊन शास्त्रे, जपमाळा, पिंछी, कमंडलु, श्रुतवस्त्रे वगैरे आवश्यक वस्तु द्याव्यांत तसेंच आयिकांनाहि द्यावें. ऐपत अस-ल्यास नूतन जिनमंदिर बांधून त्यांत नूतन जिनप्रतिमा पंचकल्याण विधिपूर्वक स्थापना करावी. जीर्णजिनचैत्यचैत्यालयांचा उद्धार करावा. मंदिरांत पालखी, छत्र, चामर वगैरे आवश्यक उपकरणें ठेवावींत. असा याचा पूर्णविधि आहे.
-कथा-
पुष्करार्धं द्वीपांतील मेरूपर्वताच्या दक्षिण मागीं जें भरतक्षेत्र आहे. त्यांतील आर्य खंडांत पृथ्वीतिलक नांवाचे एक मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी अरिदमन नामक एक मोठा पराक्रमी, न्यायवंत व सद्गुणी असा राजा राज्य करीत होता. त्याला शृंगारवती नांवाची एक लावण्यवती व सुशोल स्त्री होती. त्यांचा वासव नांवाचा मंत्री असून त्याला वसुंधरा नामें स्त्रो होती. व अमळवुद्ध नामक पुरोहित असून त्याला अमलावती नांवाची धर्मपत्नि होती. आणि विमलबुद्धि नामक राजश्रेष्ठी असून त्याला विमलसुंदरी नांवाचो भार्या होती.
इत्यादि परिवारासह तो अरिदमन राजा सुखाने राजैश्वर्य मोगीत होता. त्या नगरांत धनाढ्य, धार्मिक, ज्ञानी, षट्कर्म निपुण असे लोक राहत होते. यांचे राजा उत्तम रीतीने पालन करीत होता.
याच नगरांत विष्णुशर्मा या नांवाचा एक अति दरिद्री ब्राम्हण राहत होता. त्याला सावित्री नामें एक अत्यंत दुष्ट व रौद्रमुखी अशी स्त्री होती. त्यांना सोळा कन्या आणि चार पुत्र होते. तो भिक्षा मागून मोठ्या कष्टानें उदर निर्वाह करीत असे. पुढे त्याला त्या नगरांत मिझा हि कोणी घालीनात. तेव्हां तो अत्यंत दुःखी होऊन राहत असे.
आपणांस दारिद्य दुःख घोरसंकट आले असतां, – नगरांत राहणें योग्य नाहीं. असें नीतिवाक्य आहे समजून एके दिवशीं प्रातःकाळीं तो देशांतरी जाण्यासाठीं आपल्या नगरांतून बाहेर पडला.
तो मार्गातून जात असतां एक मनोहर उपवन त्याच्या दृष्टीं पडले. तेथे नाना प्रकारचे वृक्ष असून एक मोठा सरोवर होता. त्यांत अनेक प्रकारची सुंदर कमले प्रफुल्लित होऊन राहिली होती. आणि त्याच्या सभोंवर्ती अनेक जातीचे वृक्ष फल पुष्पांनीं भरीत होऊन राहिले होते. त्यामुळे ते उद्यान फार शोभायमान व मनोरंजन दिसत होते, अशा त्या वनांत तो विष्णुशर्मा ब्राम्हण इकडे पाहत मंदगतीनें विहार करीत असतां, एका वृक्षाखालीं चंद्रकांत शिलेवर पल्यंकासनाने बसलेले ‘शील-भूषण’ नामक भट्टारक महामुनि त्याच्या दृष्टीं पडले, त्यांना पाहतांच यांचे दर्शन केव्हां घेईन अशी त्याच्या मनांत उत्क्ट इच्छा उत्पन
झाली. तेव्हां तो मोठ्या त्वरेने त्यांच्या जवळ गेला. आणि मोठ्या भक्तीने त्यांना नमस्कार करून त्यांच्या जवळ बसला. त्या वेळीं वे मुनीश्वर ‘हेमप्रभ’ नामक विद्याधरांस घर्मोपदेश देत होते.
त्यांचा तो सदुपदेश कांहीं वेळ ऐकल्यावर तो विष्णुशर्मा ब्राम्हण मोठ्या विनयाने आपले दोन्ही हात जोडून त्या मुनीश्वरांना म्हणाला, हे सुज्ञानसागर दीनदयाघन स्वामिन् ! मी अत्यंत दारिद्यप्रस्त झाल्यामुळे दुःखाकुल होऊन देशांतरी जाऊन कोणत्याहि रीतीनें आपला उदर निर्वाह करावा. या हेतूने बाहेर पडलों आहे. तेव्हां आतां माझें दारिद्य दूर होण्यासारखा आपण एकादा उपाय मला कृपा करून सांगावा. हे त्याचे नम्र व दोन भाषण ऐकून ते मुनीश्वर त्याची सर्व परिस्थिती आपल्या अवधिज्ञानानें जाणून त्यांस म्हणाले, हे भव्यशिरोमणे विप्रोत्तमा ! आतां तू दयाधर्मावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याचे प्रतिपालन योग्यरीतीनें कर. म्हणजे त्यायोगें तुला सर्व प्रकारचीं सुखे अवश्य मिळतील. धर्मही एक सर्व सुखाने भरलेली खाणचं आहे. व सर्वांना हितकारीहि आहे. म्हणूनच सज्जन लोक धर्माचा संचय करितात. धर्माच्या योगानंच मोक्षसुख प्राप्त होते. धर्मावांचून या संसारी जीवांना दुसरा कोणो भित्र नाहीं. त्या धर्माचे दया है मूळ आहे. अशा धर्मावर प्रत्येकाने आपले चित्त सदैव ठेवून त्याचे सतत रक्षण करावं. म्हणजे पाळावे, असा धर्माचा प्रभाव आहे. यास्तव तूं निरंतर धर्माचा आश्रय कर. आणखी अलैहि आहे की, आत्महितैषी गृहस्थानें पांच प्रकारची उदुंबराचीं फलै व सात व्यसनें हीं सोडून ज्यांची बुद्धि सम्यक्त्वाने शुद्ध झाली आहे तो दर्शन प्रतिमाधारी होय. (आळ) वड, (अरळी) पिंपळ, (बसरी) पांकर, (अत्ती) उंबर (गोळी) काळाउंबर अशो पांच प्रकारचो उदुंबर फळे सोडावीत. जुगार खेळणे, मांस खाणे दारु पोणे, वेश्यासंग करणे, शिकार करणें, चोरी करणे, आणि परस्त्रीसेवन करणे, हीं सात व्यसनें पापाला कारणीभूतआहेत. म्हणून ती सोडाबींत. देव, शास्त्र व गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. लोकमूढता, देवमूढता पाखंडीमूढता (गुरुमूढता) ह्या तीन मूढता सोडाव्यात. ज्ञान, पूजा, कुरु, जाति, बल, ऋद्धि, तप व शरीर यांचा गर्व सोडावा. कुदेव-शास्त्र-गुरु आणि यांचो सेवा करणारे तिघे या सहा अनायतनांचा त्याग करावा. शंका, कांक्षा, विचिकिश्ता, मूढदृष्टी, अनुपगूइन, अस्थितीकरण, अवात्सल्य, अप्रभावना या आठ सम्यग्दर्शनांच्या दोषांचा त्याग करावा. अशा पंचवोस दोषांनी रहित असे सम्यक्त्व पाळावे. पांच अणुव्रते, तीन गुणवर्ते आणि चार शिक्षा-व्रतें अर्शी बाराव्रते पाळावीत. नित्य देवपूजा, गुरुसेवा, स्वाध्याय, संयम, बारा वर्षे व सलात्रदशन हीं षट्कनै करावीत. म्हणजे त्यायोगानें कांडणें, दळणे, चूल पेटविणे, पाणी भरणें व सांडणे, झाड लोट करणें या पांच सुनांमध्ये होणाऱ्या पापांचा नाश होऊन पुण्यसंचय होतो. अंत्यकाळी सल्लेखना धारण करात्री. वगैरे रीतीनें त्या विष्णुशर्मा ब्राम्हणांस उपदेश करून दारिद्य नाशं होण्याकरितां व सर्वसुख-संपत्ति प्राप्त होण्याकरितां त्या मुनीश्वरांनीं है पुरंदरव्रत पालन करावयास सांगून त्याचा सर्वविधि हि यथास्थित सागितला. तै सर्व ऐकून त्याला मोठा आनंद झाला. मग त्याने त्या मुनीश्वरांना भक्तीनें नमस्कार करून श्रावकांचीं. सर्व व्रते व हे पुरंदरव्रत घेतले. ते पाहून त्या हेमप्रभ विद्याधरार्ने हि हैं व्रत घेतले. तेव्हां त्या ब्राह्म-णाची धार्मिक भावना, प्रेम व धैर्य पाहून त्याच्या विषयीं त्या विद्या-धराच्या मनांत स्नेह उत्पन्न झाला. तेव्हां तो त्या ब्राह्मणास म्हणाला, हे विप्रवर्या ! आपली धार्मिक श्रद्धा पाहून मला फारच आनंद होत आहे. तरी तुम्ही या माझ्या विमानांत बसून माझ्या नगरी चला. है आदरणीय भाषण ऐकून त्यांसहि मोठा आनंद झाला. मग दोघेहि भक्तीने त्या मुनीश्वरांत नमस्कार करून व त्यांची आज्ञा घेऊन विमा-नांत बसून रत्नसंचय नगरास गेले. तेथे गेल्यावर त्यांनी स्नान, संध्यावंदन, देवपूजा, भोजन वगैरे केलें. नंतर त्या विद्याधराने त्या ब्राह्मणास चार आठ दिवस ठेऊन घेतले.
पुढे एके दिवशीं तो हेमप्रभ विद्याधर तो विष्णुशर्मा ब्राह्मण आणि पुष्कळ विद्याधरांसह सिद्धकूटजिनालयांच्या दर्शनास गेला. तेथे जाऊन त्यानें तो ब्राह्मण व ते विद्याधर यांच्यासह त्या शीलभूषण मुनीश्वरांनी सांगितलेले ते पुरंदर व्रतविधान यथाविधि करून त्याचे उद्यापनहि केलें. मग ते सर्व जन पंचमेरुपर्वतावरील समस्त चैत्यचैत्या-लयांचे आणि इतर तीर्थक्षेत्रांचे दर्शन करून आपल्या रत्नसंचय नगरीं परत आले. नंतर कांहीं दिवस त्या विद्याधरार्ने त्या ब्राम्हणांस ठेवून घेतलें.
मग एकदां तो विष्णुशर्मा ब्राह्मण त्या हेमप्रभ विद्याधरास म्हणतो, हे विद्याधरेद्रा ! आपल्या कृपेने माझा जन्म सफल झाला. आणि माझी सर्व आशाढि पूर्ण झाली. मात्र आणखी एक विशेष मनीषा शिल्लक राहिली आहे. तेव्हां तो विद्याधर म्हणतो, हे विप्रवर्या ! तुमची इच्छा आणखी काय आहे ? ती सांगा. म्हणजे दीहि पूर्ण करितो. हे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, है खर्गेद्रा । आतां मला ‘हिमवन्, महाहिमवन्, निषध, नील, रुक्मी व शिखरी या पर्वतां-वरील आणि अडीच द्वीपांतील अकृत्रिम जिनचैत्य चैत्यालयांचे दर्शन करावे. तसेंच आपल्या त्या शीलभूषण गुरुवर्यांचेहि दर्शन करावे. अशी इच्छा झाली आहे. हे ऐकून त्या विद्याधरांस मोठा संतोष वाटला. मग तो हेमप्रभ विद्याधर अनेक विद्याधर आणि विष्णुशर्मा ब्राह्मण यांना घेऊन विमानांतून तीर्थवंदनेस गेला. प्रथम सर्व तीथीचे दर्शन त्यांना करवून नंतर मुनीश्वरांचे दर्शन करवून त्या ब्राम्हणाच्या पृथ्वीतिलक नगरांस गेला. तेथे भेल्यावर त्यांनी स्नान, संध्यावंदन, देवपूजा, सामायिक, भोजन वगैरे क्रिया केल्या. आणि मोठ्या समारंभाने त्या विष्णुशर्मा ब्राम्हणांस वस्त्रालंकार व पुष्कळ धनसंपत्ति देऊन त्याचा मोठा सन्मान केला. ही
वार्ता तेथील अरिदमन राजास कळतांच तो त्या विष्णुशर्मा ब्राम्ह-णाच्या घरी तत्काल आला. आणि त्याने मोठ्या समारंमानें त्या ब्राम्ह-णास व सर्व विद्याधरांस आपल्या राजमवनीं नेले. नंतर तेथे त्या सर्वांना मिष्टान्न भोजन करवून वस्त्रालंकारानी त्यांचा सन्मान केला. मग ते सर्व विद्याधर त्या राजाची व त्या ब्राम्हणाची अनुज्ञा घेऊन आपल्या रत्नसंचय नगरीं गेले.
त्यानंतर त्या अरिदमन राजाने त्या ब्राम्हणास जाइलेका सर्व वृत्तांत विचारला. तेव्हां तो साधंत सर्व वृत्तांत सांगून म्हणाला, हे राजाधिराज ! मी शीलभूषण मुनीश्वराजवळ पुरंदर व्रत घेऊन त्या विद्याधरांच्या साह्याने यथाविधि पूजाक्रम करून त्याचे उद्यापन केले. त्यायोगाने माझे सर्व दारिद्य नष्ट होऊन मला ही विपुल रत्नकनकादि संपत्ति प्राप्त झाली. हे ऐकून त्या अरि-दमन राजांस मोठें आश्चर्य वाटले. मग त्या ब्राम्हणाचा आदरसत्कार करून त्यांत घरी पाठविले.
पुढे अरिदमन रांजा एका महामुनींश्वराजवळ जाऊन त्यांना भक्तीनें नमन करून है पुरंदरव्रत घेतां झाला. कालानुसार त्यानें है व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले. त्यावेळीं नूनन चैत्यचैत्यालय निर्माण करून त्यांची पंचकल्याणविधिपुरःसर प्रतिष्ठा केली. त्यायोगानें तो सुखाने राज्योपभोग भोगू लागला.
मग एके दिवशीं त्या अरिदमन राजाच्या मनांत या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो आपल्या पुत्रास सर्व राज्य-भार देऊन वनांत गेला. तेथे एका दिगंबर मुनीश्वरांसमीप जिनदीक्षा धारण करून घोरतपश्चरण करूं लागला. त्या व्रत-तप-प्रभावाने तो सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला.
तसेंच तो विष्णुशर्मा ब्राम्हणदि या संसाराविषयी विरक्त होऊन वनांत गेला. तेथे एका निमैथमहामुनिजवळ दिगंबर जिनदीक्षा धारण करून तपश्चर्या करूं लागला. त्यायोगाने अध्यकालीं, समाधिविधिन भरून तो स्वर्गास गेला. तेथे चिरकाल पुष्कळ सुख भोनून आयुष्यांठीं तेथून व्धवून या मर्त्यलोकी उच्च क्षत्रिय कुलांत जन्म घेऊन महाराजा शाल्य, तेथे पुष्कळ काळ राज्यैश्वर्य भोगून शेवटीं जिनदीक्षा घेता झाला. त्या व्रत-तप-प्रभावाने त्याला केवलज्ञान प्राप्त झाले. मग चतुर्णिकाय देवांनीं येऊन गंधकूटी रचिली. कांहीं दिवस देशोदेशीं विहार करून भव्य जनांस धर्मोपदेश करतो झाला. नंतर तो गंधकुटीचे विसर्जन करून एका वृक्षाखालों क्षरणयोग धारण करून बसला. आणि शुद्धात्मध्यानानें अघातिकर्माचा क्षय करून मोक्षास गेला. तेथे तो सिद्धात्मा होऊन अनंतकाल शाश्वतसुख भोगू लागला. असे या व्रताचे महात्म्य आहे.