व्रतविधि- ज्येष्ठ शु. ७ दिवशीं या व्रतआइकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं शुचिजलाने अभ्यंगस्नान प्रभातर्ती करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयांस जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोवीस तीथकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची (चोवीस, तीर्थकर, नवदेवता, श्रुत व गणधर मग चोवीस यक्ष व यक्षी) अर्चना करावी. क्षेत्रपालांचे अर्चन करावें. * ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र;असिआउसा स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. नंतर ॐ आं क्रों ह्रीं ह्रूं फट् चतुर्विंशतियक्षेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने हि १०८ फुले घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत चोबीस पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावं, त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणें करावें, तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
या प्रमाणें अष्टमी व चतुर्दशी तिथीस पूजाक्रम करावा. अशा चीवीस पूजा पूर्ण झाल्यावर शेवटी यांचं उद्यापन करावें. त्यावेळीं चोवीस तीर्थकराराधना यक्ष यक्षी सहित करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या घातकी संडात सीतोदा नांवाची एक मोठी नदी आहे. तिच्या उत्तर तटावर कच्छ नांवाचा एक विशाल देश असून त्यांत बीतशोक नामें अत्यंत मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी प्रभवतेज नामक पराक्रमी व गुणवान् राजा राज्य करीत होता. त्याला प्रभावती नांवाची एक पट्टराणी होती. ती अतिशय गुणवती होती. त्यांना प्रहसित नांवाचा एक पुत्र होता. त्याला प्रियमित्रा नाम्नी गुणशा-लिनी पत्नि होती, शिवाय प्रताप नापक मंत्री व त्याची भार्या पियकारिणी तसेच पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह वर्तमान एकदां राजा नगराच्या उद्यानांत प्रहसितवाक्य मुनीश्वर येऊन उतरल्याचे कळतांच त्यांच्या दर्शनात गेला. त्यावेळी धर्मोपदेश कांहीं वेळ ऐकल्यानंतर एकादै व्रत देण्याविषयीं राजाने यांना प्रार्थना केली, तेव्हां त्यांनी त्यांना हे चतुर्विशतियक्षत्रत पाळन करावयास सांगून त्याचा सर्व विधि हि सांगितला. मग सर्वांनीं त्यांच्या जवळ हे व्रत घेतलें. नंतर मुनींद्रास पुनः नमस्कार करून नगरी परत आले. पुढे कालानुसार त्यांनी हे व्रत पालन करून त्यायोगे ते सर्वजन स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेले आहेत. असा याचा दृष्टांत वजा खुलासा आहे.