व्रतविधि – चैत्र शु. १ दिवशीं या व्रतिकांनी एकभुक्ति करावी. आणि २ दिनीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्त्रे धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तानें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठो स्थापून तिचा पंचामृतांनों अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र; अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप एक करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्थ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावींत. दुसरे दिवशीं (चैत्र शु० ३ दिवशीं) विधिपूर्वक वास्तुविधान करावे. ४९ वास्तुकुमारांचे पृथक पृथक पूजन, बली वगैरे करावें. सत्पात्रांस आहार देऊन पारणे करावे. नंतर दुसरे दिवशीं (चैत्र शु. ४ दिनी) जलहोम करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावींत. इतक्या क्रिया केल्या म्हणजे याचे उद्यापन होतें. चार दिवस ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
या व्रताचे योगार्ने गृहशुद्धि, परमगतिशुद्धि, आन-भूमी-शुद्धि, इहगतिशुद्धि, आत्मशुद्धि होऊन शिवगतीची प्राप्ति होते.
– कथा –
पुष्करार्ध द्वीपांतील पूर्वदिशेस असलेल्या मंदरपर्वताच्या पूर्व-भागांत विदेह क्षेत्र आहे. त्यांत मंगलावती देश असून त्यामध्ये मळखेड नगर आहे. तेथे पूर्वी वज्रबाहु राजा वसुंधरा राणीसह राज्य करीत होता. त्यांना वज्रजंग पुत्र व श्रीमती सून होती, मतिवर मंत्री व त्याची स्त्री मतिवंती, नंदनकुमार पुरोहित व त्याची पत्नि नंदी, अकंपन सेनापति व त्याची मायी अमितवेगी, घनमित्र श्रेष्ठी व त्याची गृहिणी धनवती असा परिवार होता. एकदां राजा सर्व परिवारासह सागरसेन चारणमुनींच्या दर्शनास गेला होता, त्यावेळीं हे व्रत त्यांच्याजवळ घेऊन याचे यथाविधि पालन केले, त्यायोगाने तो वज्रबाहु आपल्या सातव्या मत्रांत श्रेयांस राजा शाका-तसेच मतिवर मंत्री हा मरतचक्रवर्ती झाला. अकंपन सेनापति बाहुबळी झाला. नंदनकुमार हा वृषभसेन गणधर झाला. घनभित्र हा अनंतवीर्य झाला. हे सर्वजन दीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करून कर्मक्षयान मोक्षास गेले आहेत. असे याचे महत्त्व आहे.