व्रतविधि – आश्विन शु. १ दिवशीं प्रातःकाळीं या नतग्राहकांनी प्रासुक जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत, मग सर्व पूजा सामग्री आपल्या हाती घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करा-व्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर नवदेवताप्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर नऊ पार्ने क्रमाने लावून त्यांवर गंधाक्षता, फळे, पुष्पें वगैरे ठेवावीत. नंतर अष्टद्रव्यांनी त्यांची अष्टके, स्तोत्रे व जयमाला हीं म्हणत पूजा करावी. श्रुतदेवी व गुरु यांची अर्चना करावी. नंतर यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे यथोचित अर्चन करावें. देवापुढे नेदा-दीप लावावा. ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुजिन-धर्मजिनागमजिन चैत्य चैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८
फुले पाळावीत. श्री जिनसहस्रनामस्तोत्र म्हणावे, तीर्थकर चरित्र वाचून ही मतकथाहि वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एका पात्रांत नऊ पार्ने क्रमाने लावून त्यांच्यांवर गंधाक्षता, फळे, पुष्ये बगैरे लावून एक नारळ ठेवावा. असे एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगकारती करावी. त्यादिवर्शी यथाशक्ति उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. ब्रम्हचर्य पाळावे. सत्पात्रांस आदारादिदाने द्यावीत.
याच क्रमाने नऊ ९ दिवस पूजा करून १० दिवशीं जिनपूजा करून विसर्जन करावे. याप्रमाणे हे व्रत ९ वर्षे किंवा ९ महिने करून अंतीं त्याचे उद्यापन करावे. त्यावेळीं नवदेवताविधान करावे. महाभिषेक करावा. चतुःसंबास आहारादिदानें धावींत. ९ मुनीश्वर ९ आर्थिकां-नाहि आहारादिदाने द्यावीं. ९ मिथुनांस मोजन करवून त्यांच्या ओटींत केळी, नारळ वगैरे फळे, तांबूल, गंधाक्षता, वैगैरे घालून वस्त्रालंकारानीं त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्णविधि आहे. है व्रत पूर्वी ज्यांने विधिपूर्वक पाळून त्यायोगाने उत्तम सद्गति मिळविली आहे. त्यांची कथा तुम्हांस सांगतों, ऐका. –
-कथा-
या जंबूद्वीपांतील पश्चिमविदेह क्षेत्रांत सीतोदा नामक नदी आहे आणि त्या नदीच्या उजव्या प्रदेशांत विभंगा नामें नदी आहे. त्यांच्या मध्यभागीं विजयार्द्ध नांवाचा एक मोठा उत्तुंग पर्वत आहे त्यापर्वताच्या उत्तर श्रेणीवर अलका नांवाची एक मनोहर नगरी आहे. तेथे पूर्वी अतिबल या नांवाचा एक महा पराक्रमी, रूपवान्, धर्मिष्ठ असा विद्याधर राजा राज्य करीत होता. त्याला मनोहरी नांवाची एक अत्यंत रूपवति व गुणवति अशी पट्टणी होती. त्यांचा महाबल नांवाचा एक गुणवान् पुत्र होता. त्याला गुणवती नामक एक सुंदर व सद्गुणी अशी श्री होती त्या राजाचे स्वयंवुद्ध, महा-मति, शतमति, संभिन्नमति असे चौघे मोठे बुद्धिपान असे मंत्री होते.
पुढे एके दिवशीं त्या अतिबल राजाला कोणत्याहि निमित्ताने त्या क्षणभंगुर संसाराविषयी वैराग्य झाले. त्यामुळे तो आपल्या महाचल पुत्रास सर्व राज्यभार देऊन वनांत गेला आणि तेथे एका निर्देष महामुनिजवळ दिगंबर दीक्षा धारण करून तपश्चरण करूं लागला, त्यायोगाने त्यांस केवलज्ञान उत्पन्न झाले. नंतर शुक्रुध्यानाने सर्व कर्माची निर्जरा करून मुक्तीस गेला.
इकडे तो महाबल राजा अत्यंत सुखानें सर्व परिवारासद राज्य करीत असतां त्याचा स्वयंयुद्ध मंत्री हा एके दिवशीं श्रीमंधर स्वामींच्या समवसरणांत गेला. तेथे तीर्थकरांच्या चरणीं वंदना, पूजा स्तुति करून मानव कोष्ठांत बसला. कांहीं वेळ त्यांच्या दिव्यध्वनींतून प्रकट होणारा धर्मोपदेश ऐकल्यानंतर तो तेथील गणधरांस विनयाने आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करून आपले भवांतर विचारूं लागला. तेव्हां त्यांनी त्याचे सर्व पूर्व भवांतर सांगून नवनारदांच्या पूर्व गतीचे स्वरूपहि सांगितले. मग त्या मंत्रीने त्या गणधराजवळ हे नव-नारदव्रत ग्रहण केले. नंतर तो श्रीमंधरस्वामींस व सर्वे मुनिगणास नमस्कार करून आपल्या नगरीं आला. त्या महाबल राजास व भाविक श्रावकांना या व्रताचे स्वरूप यथास्थित सांगता झाला. त्यानंतर त्या सर्वांनीं योग्य काळीं है व्रत केले. त्या योगानें आयुष्यांतीं ते सर्वजन स्वर्गास गेले आणि तेथे चिरकाल स्वर्गीय सुख भोगू लागले.