व्रतविधि – चैत्र मासाच्या शुक्लपक्षांतील प्रथम सोमवारी या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि मंगळवारी प्रभावीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अनंतनाथ तीर्थकर प्रतिमा किन्नरयक्ष व अनंतमतीयक्षीसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी, श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, देवापुढे नंदादीप लावावा. पंचरकालाचे बारा चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐंं अर्हं अनंतनाथतीर्थंकराय किन्नरयक्ष-अनंतमती यक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें बाळा-बींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी, एका पात्रांत महार्थ करून त्याने ओवाळीत मंदिरास हीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, त्यादिवशी उपवास करावा, संस्पात्रांत आहा-रादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारण करावें, तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत घालवावेत.
याप्रमाणे क्रमाने बारा मंगळवारी बारा पूजा पूर्ण केल्यावर आषाढ अष्टान्दिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं अनंतनाथ तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघात चतुर्विवदान द्यावीत. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत नरेंद्रपुर नामक नगर आहे. तेथे पूर्वी नरपती या नांवाचा राजा कमलावती नामें पट्टराणीसह सुखानें राज्य करीत होता. त्यांना धरसेन नांवाचा पुत्र होता. शिवाय मंत्री, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति वौौरे पुष्कळ परिवारजन होते. यांच्यासह विनोदाने कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं नगराच्या उद्यानांत वासुपूज्य तीर्थकरांचे समवसरण आल्याचे वर्तमान वनपालकाकडून राजांस कळतांच राजा त्यांच्या दर्शनासाठी सर्व परिवारासह गेला. वंदन, पूजनादि करून मानव कोष्ठांत जाऊन बसला. दिव्यवाणींतून प्रकट होणारा धर्मोपदेश कांहीं वेळ ऐकल्यानतर राजाने आपला भव-प्रपंच त्यांना विचारका. तो सर्व ऐकून हे मघवत्रचक्रवर्ति व्रत स्वीकारून आपल्या नगरी परत प्रवेश केला. पुढे कालानुसार है बत त्यांनीं पाळिले. संसारसुखाचा पुष्कळ अनुभव घेऊन संसारभोगाविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्याने आपल्या पुत्रास राज्यमार देऊन जिनदीक्षा ग्रहण केली. घोर तपश्चर्या करून तो त्या व्रत-तप-प्रमावाने मध्यम मैरेयकांत अद-मिंद्र देव होऊन जन्मला. तेथे २७ सागरोपन वर्षे दिव्यधुल भोगून तेथून च्यवून धर्मनाथ तीर्थकराच्या तीर्थकाली याच भरतक्षेत्रांत सुकौशल देशामध्ये साकेता (अयोध्या) नगरी आहे. तेथे दृश्राकु वंशांत उत्पन झालेला राजा सुमित्र यांचा पुत्र होऊन जन्मला. हाच मघवचक्रवर्ति होय. पुढे सुमित्राने याच्याकडे राज्यभार सोपवून जिनदीक्षा घेतली. मघवचक्रवर्ति पुष्कळ दिवस भरत, सगर बांच्या प्रभाणे राज्यसुखाचा अनुभव घेता झाला.
एके दिवशीं त्या नगराच्या उद्यान वनांत अभयघोष नांवाचे महामुनि आपल्या गंधकुटीसह येऊन उतरले. है केवली महामुनि आल्याचे वृत्त वनपालकाकडून कळतांच त्यांचे दर्शनासाठी मघव-चक्रवर्ति गेला, मोठ्या भक्तीनें वंदना, पूजा, स्तुति वगैरे केल्यावर मानत्र कोष्ठांत बसला. कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकतांच त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झालें. मग तो नगरीं परत येऊन आपल्या प्रियभित्र पुत्रांत म्हणू लागला. हे पुत्रा ! आतां आम्ही तपोवनास जातो. तुम्ही हा सर्व राज्यभार घ्या. असे म्हणून त्यानें त्याला सर्व राज्यभार विका आणि अभयघोष केवली मुनीश्वरांच्या समीप जाऊन जिनदीक्षा धारण केली. घोरतपश्चरणाच्या बलाने संपूर्ण कर्माचा क्षय करून तो मोक्षास गेला.