व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा, त्यांत फरक-आवय मासाच्या शुक्लपक्षांतील पहिल्या मंगळवारी एकसुक्ति आणि बुधवारी उपवास, पूजा वगैरे. शांतिनाथतीर्थकराराधना-मंत्रजाप्य, बारापकारच्या भक्ष्यांचे चरु करावेत. बारा मिथुनांत भोजन करवून त्यांचा वस्त्रा-दिकांनीं सत्कार करावा.
– कथा –
जंबूद्रोपांतील पूर्वविदेह क्षेत्रांन सीता नदीच्या उत्तरमागीं (बडगणभागदोलु) वत्वकावती नामक विस्तीर्ण देशांत महापुर नांवाचे मनोरम नगर आहे. तेथे पूर्वी राजा धर्मसेन नांवाचा राजा करीत होता. आपल्या सर्व परिवारासह धर्माधर्माचा विचार करीत नीतीने कालक्रमण करीत होता.
एके दिवशीं दिव्यज्ञानधारी सुधर्माचार्य महर्षि राजवाड्यांत आहारा निमित्त आले. त्यांना पाहून राजानें त्यांचे प्रतिग्रहण करून त्यांना पाकगृहांत नेऊन निरंतराय आहार दिला. नंतर मुनिराज एका आसनावर बसून धर्मोपदेश देऊ लागले. तो ऐकून राजा त्यांना म्हणाला, हे भवसागरतारक दयाळु महामुने ! माझा भववृत्त सांगा. तेव्हां त्यांनी त्याचा सर्व भववृत्त सांगितला. तो ऐकून पुनः म्हणाला, -हे गुरुराज ! है भवदुःख निवारण्याचे एकादें व्रतविधान सांगावे. मग मुनीश्वर म्हणाले-रे राजन् ! तू है सनत्कुमार चक्रवति व्रत स्वीकार कर, असे म्हणून त्यांनी त्याचा सर्वविधि सागितला. तो ऐकून त्या धर्मसेन राजांस फारच संतोष झाला. मग त्याने त्या सुधर्माचार्याजवळ है व्रत ग्रहण केलें. नंतर ते मुनिराज निघून गेले. पुढे कालानुसार है व्रत पाळून राजाने पुष्कळ सुखाचा अनुभव घेतला.
एकदां विद्युल्लतेची चंचलता पाहून राजाच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाले. मग त्याने आपल्या पुत्रांस राज्यकारभार सोपवून जिनदीक्षा घेतली आणि चाम्लवर्धनादि नियमांच्या योगाने घोरातिघोर तपश्चरण केलें. एकमास सन्यास योगधारण करून तो आयुष्यांतो आरण नांवाच्या पंधराव्या स्वर्गात देव झाला. तेथे बावीससागर वर्षे स्वर्गीय सुख भोगून आयुष्यावसानीं तेथून च्यवून तो- जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत कौशल नांचाचा विशाल देश आहे. त्यामध्ये विनीतपुर नांवाचे एक अत्यंत शोभिवंत नगर आहे. तेथे इक्ष्वाकुवंशी नववीर्य नांवाचा राजा मोठ्या ऐश्वर्याने राज्य करीत होता. त्याला सहदेवी नांत्राची सुंदर, सुशील, सदाचारी पट्टराणी होती. तिच्या उदरीं पूर्वोक्त देव येऊन अवतरला. त्याचे नामकरणादि विधि करून योग्य दिवशीं सनत्कुमार असे नांव ठेवण्यांत आले. क्रमाक्रमाने युवावस्थेत आल्यावर चक्रवर्ति राजा झाला. अनेक स्त्रियांसह ऐहिक-राज्य सुख भोगू लागला. कांहीं निमिताने त्याच्या मनांत या संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्याला सर्व राज्यभार पुत्रांस देऊन बनांत जाऊन शिवगुप्ति केवलो मुनीश्वराजवळ जिनदीक्षा घेतली. पुढे त्यांना तप-प्रभावाने सप्तऋद्धि प्राप्त झाल्या. घातिकर्माच्या क्षयाने त्यांना केवल-ज्ञान उत्पन्न झाल्यावर त्यानें विहार करून धर्मोपदेश केला. कांडीं कालाने तो एकांती बसून शुक्लध्यान बलानें अघातिकर्माचा क्षय करून मोक्षास गेला. आणि तेथे अनंतकाल शाश्वत सुखाचा अनुभव घेऊं लागला.