व्रतविधि – माघ शुद्धांतील पहिल्या गुरुवारी या व्रत आइकांनीं एकमुक्ति करावी, आणि शुक्रवारी प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंग -स्नान करून अंगावर दृढ धौतवस्त्रे धारण करावीत. मग पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्री जिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर सुदत्त ( भूतकाल) जिनेश्वरांस यक्षयश्रीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा, देवापुढे एका पाटावर सहा स्वस्तिके काढून त्यांवर सहा पार्ने लावून त्यांच्यावर अष्टद्रव्ये ठेवावींत आणि निर्वाणापासून सुदत्त तीर्थकरापर्यंत सहा तीर्थकराचीं अष्टके स्तोत्रे जयमाला हीं म्हणत त्यांची अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. ॐ ह्रीं अर्हं सुदत्ततीर्थंकराय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा ही वाचावी. नंतर एका पात्रांत ६ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवाळीत जिनालयास तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादि-वशीं उपवास करून धध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावें.
या प्रमाणे सहा शुक्रवारी पूजाक्रप करून शेवटी याचे उद्यापन करावे, श्रीसुदत्ततीर्थ करविधान करून महाभिषेक करावा. चतुःसेवास चारप्रकारची दाने द्यावीत. सहा दंपतीस आपल्या घरीं भोजन करवून त्यांना नूतन वस्त्रांचा आहेर करावा. आणि त्यांच्या ओठ्यांत नारळ, पान सुपारी वगैरे घालून त्यांचा मोठा सन्नान करावा. असा या मताचा पूर्णविधि आहे.
भातो है व्रत पूर्वी यथाविधि पाळल्यामुळे ज्यांना स्त्रर्गादि सुखे प्राप्त झाली आहेत, त्यांची कथा येथे क्थन करितों. ते तुम्ही शांत चितानें ऐका –
– कथा-
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेहक्षेत्रांत सीता नदी आहे. तिच्या दक्षिणभागीं वत्स नामक एक मोठा देश आहे. त्यांत सुसीमा नांवाची एक नगरी आहे. तेथे पूर्वी सिहरथ नांवाचा एक मोठा पराक्रमी राज्जा राज्य करीत होता. त्याला गुणमाला नामक एक सुशील सुद्गुणो भशी राणी होती. यास मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापति वगैरे पुष्कळ परिवार जन होते. यां सर्वांसह तो सिंहरथ राजा सुखाने राज्य करीत असतां, एके दिवशीं त्यांच्या राजवाड्यांत आहाराकरितां तपोनिधि मुनिराज आले. तेव्हां राजाने त्यांचें यथायोग्य प्रतिग्रहण करून आपल्या पाकशाळेत त्यांना नेले. आणि त्यांना यथाविधि निरंतराय आहार दिला. मग ते मुनीश्वर एका आसनावर बसले असतां, – त्या राजाने त्यांना बंदना करून एकादें व्रत मागितले. मग त्या मुनीश्वरांनी श्रीकुंथुनाथतीर्थकरचक्रवर्तिवत हे पालन करा-वयांस सांगून त्यांच्या काल व विधीहि सांगितला. नंतर त्या सिंहस्थ राजाने ते व्रत घेतले. मग ते मुनीश्वर सर्वांना आशिर्वाद देऊन आपल्या स्थानों निघून गेले, नंतर कालानुसार त्या राजाने ते व्रत यथाविधि पाळून त्यांचे उद्यापन केले व पुष्कळ दिवस राज्यैश्वर्य भोगिले.
एके दिवशी रात्रीं महालाच्या गच्चीवर बसले असतां, उल्का-पात झालेला त्यांचा दृष्टी पडला. तेव्हां त्याच्या मनांत या क्षणिक-संसाराविषयी वैराग्य उधन्न झाले. मग आपल्या पुत्रांस सर्व राज्यमार देऊन वनांत गेला आणि श्रीवृषसेन मुनोश्वरांजवळ जिनदीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागला. एकदशांगधारी होऊन त्यांने षोडशमावना वगैरे भाविल्या, त्याला तीर्थकर नामकर्पाचा बंध पडला. शेवटीं समाधिविधोनें मरून सर्वार्थसिद्धीत अहमिंद्र देव झाला. तेथे तो देव चिरकाल पुष्कळ सुखाचा अनुभव घेऊन आयुष्यांती तेथून च्यवून – या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कुरुजांगल नांनक एक मोठा देश आहे. त्यांत हस्तिनापुर या नांवाचे एक मनोहर व सुंदर नगर आहे. तेथे कुरुवंशी सूरसेन नामक एक मोठा पराक्रती, नीतिमान्, धर्मनिष्ठ असा राजा राज्य करीत होता. त्याला श्रीकांता महादेवी नामें धर्मपत्नी होती. तिच्या गर्मी तो पूर्वोक्त अहनिंद्र देव येऊन अवतरला. त्यावेळीं चतुर्णिकाय देवानीं तेथे येऊन गर्भात्रतार कल्याणाचा महोत्सव केला.
नऊ मास पूर्ण झाल्यावर तिला एक सुंदर पुत्र जन्मला. त्यावेळीं ही चतुर्णिकाय देवांनी तेथे येऊन जन्माभिषेक कल्याण महोत्सव केला. आणि त्यांनी त्या बालकाचे नांत्र ‘कुंथुनाथ’ असे ठेविले.
पुढे तो तरुणावस्थेत आल्यावर कामदेव, चक्रवर्ति व तीर्थकर या पदवीचे सर्व ऐश्वर्य पुष्कळ काळ भोगतां झाला.
मग त्यांच्या मनांत या संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे मोठ्या समारंभानें तो वनांत जाऊन दीक्षा घेते झाला, त्या समयीं दीक्षा कल्याण महोत्सव चतुर्णिकाय देवांनी केला. घोर तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांना केवलज्ञान उत्पन्न झाले. तेव्हां चतुर्णिकाय देवांनी येऊन केवलज्ञान कल्याणोत्सव केला व समवसरणाची रचना केली त्यासह ते कुंथुनाथ तीर्थ कर देशोदेशीं विहार करून मध्यजनांस धर्मोग्देश करते झाले. नंतर श्रीसम्मेदशिखरावर जाऊन समवसरणाचे विसर्जन करून योगसाधन करूं लागले. तेव्हां शुक्रुध्यानाच्या प्रमा-वार्ने सर्व अघातिकमीचा नाश करून ते मोक्षास गेले आहेत. असा या व्रताचा प्रभाव आहे.