व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुद्धपक्षांतील सप्तमी ७ दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि अष्टमी व चतुर्दशी (८ व १४) दिवशीं प्रातःकाळीं प्रालुक पाण्यार्ने अभ्यं-गस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावींत. मग सर्व पूजाद्रव्यें आपल्या हाती घेऊन जिनालयास गमन करावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तिने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर भूत-काल अमलप्रभ तीर्थकर प्रतिमा यक्षयझीसहित स्थापून त्यांचा पंचामृ-तांनीं अभिषेक करावा. मग देवापुढे एका पाटावर गंधाने सात स्वस्तिके लिहून त्यांच्यावर सात पाने मांडून गंधाक्षता, फर्के, फुले वगैरे ठेवावीत. नंतर निर्वाणापासून अमलप्रभापर्यंत सात मूनकाल तीर्थकरांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्यांचीं अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचपका-नांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी आणि यश्न, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं अमलप्रभतीर्थंकराय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुणे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. अमलप्रभ तीर्थंकर चरित्र वाचावे. ही व्रतकथा वाचावी, नंतर एका पात्रांत सात पार्ने मांडून त्यांच्यावर अष्टद्रव्यै वे एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रक्षिणा घालून मंगकारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सधात्रांस आहारादि दाने यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याच कमाने चार अष्टमीस व तीन चतुर्दशीस अशा सात पूजा पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं अमलमम तीर्थंकर विधान करून महाभिषेक करावा, १०८ कमलपुष्पें वाहवीत. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. दीन अनाथ यांना अभयदान द्यावे. सात मिथुनांस भोजन करवून त्यांना वने, फर्के, फुले, नारळ पान सुपारी वगैरे वस्तु देऊन त्यांचा सन्मान करावा. घंटा, दर्पण, छत्र, चामरादि आवश्यक उपकरणे मंदिरांत ठेवावींत. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
हैं व्रत पूर्वी यथाविधि पालन केल्यामुळे ज्यांना सर्व वैभत्र सुस्व प्राप्त झाले आहे, त्यांची कथा आतां सांगतों. ते तुम्ही शांतचिचाने ऐका.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत कच्छ नांवाचा एक विशाल देश आहे. त्यांत क्षेमपुर नांवाचे एक रमणीय नगर असून तेथे पूर्वी नंदक या नांवाचा एक मोठा पराक्रमी, वैभवशाली राजा राज्य करीत होता. त्याला स्त्री, पुत्र, मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी वगैरे परिवारजन होते. या सर्व परिजनांसह सुखाने कालक्रमण करीत असतां, – एके दिवशीं तो आपल्या परिवारासह श्री अनंतनाथ तीर्थकरांच्या दिव्य समवसरणांत गेला होता. तेव्हां तो भगवंतांस तीन प्रदक्षिणापूर्वक भक्तीनें साष्टांग नमस्कारादि करून मनुष्यकोष्ठांत जाऊन बसला. मग कांहों वेळ तीर्थंकरांचा दिव्यधर्मोपदेश श्रवण केल्यावर तो आपले दोन्ही हात जोडून गणधरांना म्हणाला, हे संसारसागरतारक गणराज ! आपण आम्हांस सकल-वैभव सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान निरूपण करावे. हे त्याचे नम्र वचन ऐकून ते गणाधीश त्यांना म्हणाले, हे भव्य राजन् ! आतां तुम्हांस अरनाथ तीर्थकर चक्रवर्ति व्रत है पालन करण्यास अति उचित आहे. असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा काल व विधि सर्व यथास्थित निरूपिला. ते ऐकून नंदक राजादि सर्वांस मोठा आनंद झाला. मग त्यानें त्यांना भक्तीने प्रणाम करून ते व्रत स्वीकारिलें, नंतर ते सर्वजन भक्तीने त्या श्रीअनंतनाथ जिनेश्वरांस व गणधरादि मुनीश्वरांस प्रणिपात करून आपल्या नगरी परत आले. तेथे आल्यावर कालानुसार त्या राजानें ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केलें. याप्रमाणें तो धर्मकायाँत काल क्रर्मू लागला.
पुढें एके दिवशीं तो आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर मोठ्या आनंदात बसला असतां, आकाशांतील मेघडंबराची विचित्रता पाइ-तांच त्याच्या मनांत या क्षणिक संसाराविषयीं प्रबल वैराग्य उत्पन्न झाले. मग तो आपल्या पुत्रास सर्व राज्यभार देऊन तपोवनांत निघून गेला. तेथे एका दिगंबर मुनीश्वरांसन्निध जिनदीक्षा धारण करून घोरतपश्चर्या क.रूं लागला. पुढे त्या तपप्रभावानें व समाधिविधीने शेवटीं मरून जयंत नामक अनुत्तर विमानांत अहमिंद्र देव झाला. तेथे पुष्कळ काल सुख भोगून आयुष्यांती तेथून च्यवून – या जंबूद्वीपांतीऊ भरतक्षेत्रांत कुरुंजांगल नांवाचा एक मोठा विस्तीर्ण देश असून त्यांत हस्तिनापुर नांवाचे एक मोठें सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी कुरुवंशी, काश्यपगोत्री सुदर्शन नांवाचा एक मोठा पराक्रमी, गुणवान्, धर्मनिष्ठ असा राजा राज्य करीत होता. त्याला मित्रश्री नामक एक सुशील, सुंदर अशी महादेवी राणी होती. इच्यासह तो राजा सुखानें कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं ती मित्रश्री राणी विलासमंदिरांत सुखशय्येवर आपल्या पतिसह पहूडली असतां, त्या रात्रींच्या अंतमहरीं तिला सोळा मंत्रोच्चार करून स्वतः आपल्या दातांनी पंचमुष्टी लोच करून दिगंबर दीक्षा घेतली.
पुढे घोर तपश्चरणाने चार घातिक्रमांचा त्यांनी नाश केल्यामुळे त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. मग चतुर्णिकाय देव येऊन त्यांनी केवल-ज्ञान कल्याणाचा उत्सव केला. आणि समवसरणाची रचना केळी. त्या समवसरणासह ते अरनाथ तीर्थकर प्रभु पुष्कळ वर्षे धर्मोपदेश करीत करीत सम्मेदशिखरजी पर्वतावर आले. तेथे समवसरणाचे विसर्जन करून एका शुद्ध शिलेबर क्षपणयोगचारण करून बसले. आणि शुक्लध्यानाच्या योगार्ने चार अघातिकमीचा नाश करून ते अरनाथ तीर्थकर मोक्षास गेले. तेव्हां चतुर्णिकाय देत्र तेथे येऊन त्यांनी त्यांचा निर्वाण कल्याणाचा महोत्सव केला. आणि सर्व देत्र जय-जयकार करीत आपल्या स्थानीं निघून गेले. ते अरनाथ तीर्थकर सिद्धपरमेष्ठो होऊन तेथे अनंतकाल शाश्वत सुखाचा अनुभव घेऊं लागले. असे या व्रताचे माहात्म्य आहे