व्रतविधि – आषाढ शु. ७ दिनीं या व्रत धारकानीं एकभुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्त्र धारण करावींत, सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर उद्धर भूतकालतीर्थकर प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर ८ स्वस्तिकें काढून त्यावर ८ पार्ने, अक्षता, फलें, फुलें वगैरे ठेवावींत. निर्वाणापासून उद्धरापर्यंत तीर्थकरांची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी, पंचपकान्नांचे चरु करावेत. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं उद्धर तीर्थंकराय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ कमलपुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत आठ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावा व त्याने ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशी उपवास करावा. सत्पात्रांत आहारदान द्यावे. दुसरे दिवर्शी पूजा व दान करून पारणे करावे, बन्हचर्यर्वक तीन दिवस धर्मध्यानांत घालवावेत.
याप्रमाणे ८ स व चतुर्दशोस पूजाक्रम करून अशा ८ पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळी उद्धर तीर्थंकरविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंबास चतुर्विध दातें द्यावीत. आठ दंपत्तीस भोजन करवून वस्त्र, फल, तांबूलादिकांनी त्यांचा सन्मान करावा. जिनमंदिरांत आवश्यक वस्तु ठेवाव्यात. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंवृद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यस्खंड असून त्यांत काश्मीर नांवाचा देश विस्तीर्ण आहे. त्यामध्ये भूतिलक नांवाचे एक सुंदर पट्टण आहे. तेथे प्राचीन कालीं भूपाल नांवाचा पराक्रमी व गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला भूषणदेवी नाम्न्ना सुंदर, सुशील गुणवती अशी पट्टराणी होती. शिवाय मंत्रो, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापत्ति इत्यादि पुष्कळ परिवार जन होते. यांच्यासह सुखानें कालक्रमण करोत असतां, एके दिवशीं संभूत नामक दिगंबर दिव्यज्ञानी मुनीश्व चर्येनिमित्त राजवाड्यांत आले. त्यांना पाहतांच राजांस मोठा आनं झाला. मग त्याने त्यांना पडघावून पाकगृहांत नेलें आणि निरंतरा नवधाभक्तीनें आहार दिला. नंतर मुनीश्वर एका आसनावर स्वस्थ बस असतां, – राजाने एकादें बउविधान निरूपण करण्यास प्रश्न केल तेव्हां त्यांनीं है सुभौमचक्रवर्ति व्रत करण्यास सांगून त्यांचा सर्व विधि त्यांना कथिला. ते ऐकून आनंदाने है व्रत राजाने स्वीकारिर्ले, नंतर ते मुनिराज निघून गेले. पुढे समयानुसार है व्रत राजाने पाळिलें, सुखानें राज्यैश्वर्य भोगोत असतां, एके दिवशीं शत्रूशीं संग्रांमांत लढत असतां मानभंग झाल्यामुळे त्याच्या मनांत तात्काळ वैराग्य उत्पन्न झाले, मग त्याने वनांत जाऊन त्या संभूत नामें मुनीश्वरांजवळ जिनदीक्षा ग्रहण केली. चक्रवर्ति-लक्ष्मी पाहून त्यानें निदान केले. तो अंतीं समाधीन मरण पावून महाशुक्रकल्यांत देव झाला. तेथील स्वर्गीय सुख भोगून या मृत्युलोकों भरत क्षेत्रांतील कौशल देशांत साकेता (अयोध्या) नगरी आहे तेथे सहस्रबाहु नांवाचा इक्ष्वाकुवंशीय राजा चित्रावती नामक पट्टराणीसह सुखाने राज्य करीत होता. त्यांना जमदनी नामें पुत्र तो स्वर्गीय देव येऊन झाला. कुमारावस्थेतच त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे मिध्यातापसी होऊन पंचामीतप साधन करूं लागला.
इकडे एका नगरांत दृढग्राही नावाचा राजा राज्य करीत होता. तेथेच हरिवर्म नांवाचा एक ब्राम्हण राहात असे. हा ब्राम्हण व तो राजा यांचा मोठा स्नेहमाव होता. हे दोघे मित्र एकदां या संसाराचा वीट आल्यामुळे जिनदीक्षा घेऊन घोर तपश्चरण करूं लागले. आयु-प्यांतीं मरण पावून दृढग्राही राजा शतारकल्यांत देव झाला. आणि तो हरिवर्मा ब्राम्हण ज्योतिर्लोकांत ज्योतिष्कदेव झाला. एकदां हे दोघे श्रीसम्मेदशिखरजी सिद्धक्षेत्रावर दर्शनासाठीं आले असतां, – दोघांचा साहजिक संयोग झाला. त्या समयीं तपाच्या माहात्म्याविषर्थी दोघांचा मोठा वादविवादसुख झाला. ते उभयतां पक्ष्यांचे रूप घेऊन त्या जम-दग्नी तपस्त्रीच्या झोपडींत (तापसाश्रमांत) आपली घरटीं करून राहिले. एके दिवशीं ते दोन्ही पक्षी परस्परांशी बोलू लागले. तेव्हां त्यांतील एक पक्षी दुसऱ्याला म्हणतो, आतां मी एका वनांत जाऊन आलो. तेथें जो गोष्ट मला ऐकावयास मिळाली ती ऐकून मला अत्यंत बाईट वाटले. तेव्हां दुसरा पक्षी त्यास विचारतो, ती वाईट गोष्ट कोणतो ? सांग ! नंतर तो म्हणाला, – आतां या जमदग्नीस जो गति प्राप्त व्हावयाची आहे ती मला मिळो. मग तो पक्षी म्हणतो, त्याला प्राप्त व्हावयाचो गति तरी कोणती? तेव्हां तो म्हणाला, या जमद-श्रीसः आतां नरकगति प्राप्त होणार आहे. हे पक्ष्यांचे संभाषण ऐकतांच तो जमदग्नो तापसी आपल्या दाढीवर हात फिरवीत मोठ्या कोरावे-शार्ने त्यांच्या समीप आला आणि त्यांना म्हणाला, हे पक्ष्यांनो ! मला नरकगति होते है तुम्हांस कसे कळले ? काय कोणी सांगितलं ? तेव्हां त्यांतील एका पक्षाने म्हटलें,’ अपुत्रस्य गतिर्नास्ति’ असे शास्त्र वचन आहे ना ? हे ऐकडांच त्याच्या मनास पश्चाताप वाटला. आजपर्यंत आपण केलेले हैं तप व्यर्थ आहे. असे जाणून तो वाताळ तेथून निघून उज्जयिनो नगरास आला. तेथे पारद नांवाचा नरपति राज्य करीत होता. हा जमदग्नो याचा सहोदर मामा होता. त्याच्या समेत जातांच त्यांनी त्याचा योग्य आदरसत्कार केला. त्यावळीं जमद-ग्रोनें आपला सर्व वृतांत त्यांस कळवून विवाह करून घेण्याची जी आपली मनीषा ती व्यक्त करून दाखविली आणि म्हटलें, – आपली एकादी कन्या मला मिळावी. त्याकरितांच आतां मी येथे आलो आहे.
हे त्याचे माषण ऐकून त्याने आपल्या दोन चार कन्या त्याच्यापुढे आणून उभ्या केल्या. आणि म्हटले, या पहा आमच्या कन्या. यांतून तुम्हांस जी पसंत पडेल ती घेऊन जा. असे म्हणतांच – त्याचे ते तापसरूप पाहून-भिऊन-दोन तीन कन्या तात्काळ तेथून पळून गेल्या.
त्यांतील एक रेणूकी नांवाची धाकटी होती तिला कदळो फल दाख-वितांच ते पाहून हासत हासत ती त्या तापस्याजवळ जातांच तिला घेऊन तो आपल्या आश्रमास गेला. तेथे तिचे उत्तम रीतीनें पालन पोषण करूं लागला. पुढे ती प्रौढ झाल्यावर तिच्यार्थी त्यानें विवाह केला. मग तो सुखानें कालक्रमण करूं लागला. कांहीं काल लोटल्यावर इच्यापासून पतिराम व परशुराम असे दोन पुत्र झाले.
एके दिवशी अरिंजय नामक चुनी त्या आश्रमास आले, तेव्हां त्या रेणूकीने हा आपला भाऊ आहे असे समजून स्थांना वंदना केली. त्या समर्थी से तिला आशिर्वाद देऊन म्हणाले, हे कन्ये! आज तुला सम्यग्दर्शनरूपी भन देण्यास आलो आहे. त्या योगाने तुला स्वर्गादि संपत्ति सहज प्राप्त होईल. असे म्हणून ते तिला कामधेनु विद्यामंत्र व एक परशु देऊन निघून गेले.
पुढे एकदां सहस्रबाहु राजा उरवनाचो शोमा बाहाण्यासाठी – फिरत फिरत तेथे आला असतां, त्या रेणूकोर्ने उपचाराने त्याला भोजन करण्यासाठीं बोलावून कामधेनूपासून प्राप्त झालेली सुक्स पकाने वाढिलीं. त्याचा स्त्रद व चत्र पाहून तो आश्चर्य चकित होऊन म्हणाला, हे काय बरे ? तेव्हां ती म्हणालो, महाराज! हा अरिंजय मुनीश्व-राचा प्रसाद आहे वैगेरे तिचे भाषण ऐकून त्या कामधेनूस बलात्कारानें घेऊन आपल्या प्राप्तादी चालला. तेव्हां स्वाभाविकच ते पतिराम व परशुराम यांनी आपल्या आईबापांचे दुःखनिवारण केले आणि अनेक विद्या साधन केली.
एके दिवशीं त्या दोघा बंधूनीं साकेता नगरी रात्रीं येऊन त्या वज्रबाहू राजास मारून त्याच्या वंशाचा उच्छेद केला. आपल्या अधि-कारांत सर्व राज्यकारभार घेऊन ते परत येऊ लागले.
यापूर्वीच वज्रबाहू राजाचो राणी चित्रावती ही गुप्तरीत्तीनें दूर देशांतरी जाऊन एका वनांत शांडिल्य नामक तापसाश्रमांत राहिली होती. तिच्या गभर्भात महाशुक्रांतील एक देव येऊन अवतरला होता. नऊ मास पूर्ण होतांच ती एका सुंदर पुत्राला प्रसवली. त्यांचे नांव सुभौम असे ठेवण्यांत आले होतें. तिचे पालन पोषण करीत असतां, – एकदां त्या वनांत चर्येनिमित्त शिवगुप्ती नांवाचे महामुनि त्यांच्या आश्रमांत आले. तेव्हां त्या चित्रावतीर्ने त्यांना पढधावून आंत आणून नवधा भक्तीने आहार दिला. नंतर ते एका आसनावर स्वस्थ बसले असतां, -चित्रावतीनें आपल्या पुत्राचा सर्व वृत्तांत त्यांना विचारला. त्यावेळीं त्यांनी अवधिज्ञानानें त्याचे सर्व भविष्य जाणून तिला म्हटले, चाई ! हा आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी षट्खंडाचा अधिपती होईल. वगैरे सांगून ते मुनी तेथून निघून गेले.
इकडे ते पीतराम व परशुराम यांनीं बेचाळीस क्षत्रिय वंशाचे निर्मूलन केले, तेव्हां त्यांच्या गृहावर उल्कापात झाला. त्यावेळीं एका निमित्त ज्ञान्यास-नैमित्तिकांस बोलावून विचारिले. तेव्हां त्यानें त्यांस असे सांगितले की, तुमचा एक बलवान् शत्रु या जगांत उत्पन्न होऊन वाढत आहे. तो तुमचा नाश करणार आहे. हे त्याचे वचन ऐकून आतां त्याची परीक्षा करावी म्हणून एक तंत्र केले.
इकडे त्या सुभौम राजाचो-माता-आपल्या पुत्रासह आपल्या गृहीं आली, आणि आपल्या पुत्राचा पूर्व वृत्तांत सर्व आपल्या पुत्रांस सांगितला. तो ऐकून त्यानें आपल्या मातेचे सर्व दुःख निवारण केले.
पुढे एके दिवशीं त्या सुभौम राजपुत्राचे रूपातिशय पाहून त्या राजाचे परिचारक त्या आश्रमांत जाऊन गुप्तरूपाने पाहते झाले. ते आग्ले राजे पतिराम व परशुराम हे दोघे त्यांचे वृत्त ऐकताच अनेक सैम्यासह हस्तीवर बसून चालले. सुभौम राजपुत्राच्या पूर्व पुण्याईने एकाएकी आयुध शाळेत चक्ररत्नाचा उत्पत्ति होऊन त्यांच्यापुढे येऊन ते उभे राहिले. तेव्हां ते उचलून घऊन त्या सुभौम राजपुत्राने त्या परशुरामास तात्काळ मारिलें. आणि अभय घोषणा करीत ब्राम्हणांच्या अनेक वंशांचे निर्मूलन केले. तो सुभौम चक्रो या भरतक्षेत्रांतील षट् खंडाचा अधिपति झाला. आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी तो चक्रवर्ति झाला. साठ हजार वर्षे त्याचे ( सुभौम राजाचे) परमायुष्य होते. अठ्ठावीस धनुष्य उंच शरीर होते. तो सुखाने दशांग भोगांचा अनुभव घेत असतां – एके दिवशीं अमृतरसायन नामक एक बाण त्याला मिळाला. त्याने जिव्हा स्वाद लेपट होऊन एका पाण्यात मारिले. तो तात्काळ मरून ज्योतिर्लोकांत एक मिथ्यात्वी देव झाला. तेथे तो आपल्या विभंगावधिज्ञानानें पूर्व बैर स्मरून वणिग्वेषाने येऊन एक आम्र फळ आणून त्या राजास दाखवितां झाला. मग त्या राजास बोलावून नेवून हा सम्यक्त्वी आहे असे जाणून समुद्राच्या पाण्यांवर पंच नमस्कार मंत्र (णमोकार मंत्र) लिहावयास लावले. त्याने त्याला तो मंत्र पायाने पुसावयास सांगितले. तेव्हां तसे करतांच तो सम्यक्त्वहीन झाला. आतां हा मारण्यास योग्य आहे असे जाणून त्याने त्या सुभौम राजांस अनेक उपसगानी मारीले. त्यावेळीं तो क्रोध भावाने तात्काळ मरून नरकास गेला. तो सहस्रबाहु राजा लोभाने मरण पावून तिर्थच गतींत जाऊन जन्मला. आणि ते जमदझोचे पुत्र पोतराम व परशुराम हे हिंसानंदामुळे नरकांत जाऊन उत्पन्न झाले अर्थात् तो सुभौम चक्री जरी नरकास गेला असला तरी तो या व्रत माहात्म्याने भविष्यत्कालीं तीर्थंकर होणार आहे. हे व्रत पूर्वी सुभौम चक्रवर्तीने आपल्या पूर्व भवांत पाळिले होते. त्या कारणानें त्यास पुढे तीर्थकर पदवी मिळणार आहे. है व्रत सुभौम चक्रवर्तिन पाळिले आहे. म्हणून या व्रतास सुभौम चक्रवर्तिव्रत असे म्हणतात. असे याचे महत्व आहे.