व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. १० दिनीं एकमुक्ति आणि ११ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पाटावर ११ पार्ने मांडणें, पात्रांत ११ पार्ने मांडणे, अकरा पूजा पूर्ण झाल्यावर उद्यापन कार्तिक अष्टान्हिकांत करणें, अकरा मिथुनांस मोजन करवून सन्मान करणे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील ऐरावत क्षेत्रांत तेथील एका देशांत श्रीपूर नांवाचे एक नगर आहे. तेथे पूर्वी सुंदर नांवाचा राजा आपल्या प्रिय पद्मावती पट्टराणीसह सुखानें राज्य करीत होता. त्यांना विनयंधर नांवाचा एक पुत्र होता. शिवाय मंध्यादि अनेक परिवारांसह तो काल-करण करीत असतों, एके दिवशी त्या नगराच्या उद्यानवनांत धर्म केरली आहे. ही शुभश चनगलकाकडून राजांस कळतांच तो आपल्या परिजन व पुत्रञ्जन यांच्यासह तेथे गेला व भक्तीने त्यांची वंदना पूजा, स्तुति वगैरे करून त्यांच्यासनिष बसला. कांडी वेळ त्यांच्यासुखे धर्मोपदेश ऐकल्यावर त्याने है व्रत स्वीकारिलें व कालानु सार पाळीले. त्यायोगे त्यांना उत्तम पुण्यबंध जाइला. एकदां तो प्रासा-दाच्या गच्चोवर स्वस्थपणे बसला असतां, आकाशांत एका क्षणार्थात उत्पन्न होऊन नाश पावणारा मेघडंबर दृष्टीं पडला. मग त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां त्याने आपल्या विनयंधर पुत्रास राज्यमार देऊन आपण वनांत जाऊन एका निर्भथ महामुनींसमीप दिगंबर जिनदीक्षा ग्रहण केलो. मग उत्तम रीतीनें तपश्चर्या करून आयु-व्यांीं समाधीने मरण पावून महाशुक्र स्वगर्गात देव झाला. तेथे तो पुष्कळ कालपर्यंत स्वर्गीय सुख अनुभवून आयुष्यांतीं तेथून च्यवून -या मरत क्षेत्रांतील कौशांबी नगरांत विजय महाराज आणि देवी प्रसंकरी यांच्या उदरीं जयसेन नामे पुत्र होऊन जन्मला. तो यौवना-वस्थेत चक्रवर्ति (चक्रधर) होऊन सहा खंडाचे प्रतिपालन करूं लागला. नवनिधी, चौदा रखें इत्यादि अनेक वैभवांचा भोक्ता झाला.
एके दिवशीं आकाशांतून खालीं येणारा उल्कापात पाहून त्याच्या मनांत अकस्मात् विरागभाव उत्पन्न झाला. तेव्हां जयसेन चक्रवर्तीन आपच्या पुत्रांस राज्यभार देऊन आपण वनांत जाऊन वरदत्त नामक केवली मुनि समीप निर्ग्रथदीक्षा घेतली. तीव्रतर तपश्चरण करून तो समाधीनें मृत्यु पावून अनुत्तर स्वगातील जयंत विमानांत अहमिद्र देव होऊन जन्मला. तेथून सद्गति सुख-शाश्वत सुख मिळवीक .