व्रतविधि – कार्तिक शु. ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि १ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्ने धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. आणि जिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा. मग श्रीपीठावर श्रीपंचपर-मेष्ठो प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. नंतर देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिकें क्रमाने काढून त्यांच्यावर पार्ने मांडून त्यावर अष्टद्रव्ये ठेवावीत. पंचपरमेष्ठींचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्यांचीं पूजा करावी. पंचपकान्नांचे चह करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. नंतर यक्ष, यक्षो व क्षेत्रपाल यांचे अर्चन करावें. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रों ह्र; असिआउसा पंचपरमेष्ठिभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुणे पाळावीत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जर करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करून ही बतकया वाचावी, मग एका पात्रांत पांच पाने मांडून स्वांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाय करावा. आणि त्याने ओवाळीत तोन प्रदक्षिणा घालून मंगकारती करावी. स्वादिवशी उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सधात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा, दानादि करून आपण पारणें करावें, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
या प्रमाणे हे व्रत पूजन महिन्यांतून दोनदां त्याच तिथींस करावे. अशा चोवीस पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्दिकांत याचे उथापन करावे, त्यावेळी श्रोपंचपरमेष्ठो विधान करून महाभिषेक करावा. चतुः संघांस चतुर्विध दार्ने देऊन दोन अनाथांना अभयदान देऊन भोजन बार्वे. पांच दंपतीस भोजन करवून नूजन वत्वांचा आहेर करून त्यांच्या ओटींत पान, सुपारी, गंधाक्षता, नारळ, सुपारी, केळी फळे, पुष्वें वगैरे घालून त्यांचा सत्कार करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
हे व्रत पूर्वी सीतादेवी, मंदोदरी, तारादेवी, (तारामति) द्रौपदी, रुक्मिणी, अंजनादेवी, नीलावती वगैरे अनेक साध्वी स्त्रियांनी यथाविधी पाळून याचे उद्यापन केले आहे. या व्रताच्या पुण्यप्रमावाने त्यांना सर्व अभ्युदय सुखे प्राप्त झाली आहेत. असा या व्रताचा दृष्टांत आहे.