व्रतविधि – कार्तिक शुक्ल पक्षांतील पहिल्या मंगळवारी या व्रत आइकांनीं एकमुक्ति करावी. आणि बुधवारी प्रातःकाळीं प्रासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्ने धारण करावींत. मग सर्व पूजा सामुग्री बरोबर घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. मग श्रीपीठावर पंचपरमेष्ठि प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पांच पाने व अष्टद्रव्ये लावावींत. नंतर पंचपरमेष्ठींचीं अष्टद्रव्यांनीं पूजा करावी, पंचपकान्नांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चा करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. त्यानंतर ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्ये घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून जीवंधर चरित्र वाचून ही बनकथाहि वाचावी. मग एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाब्र्व्य करावा. आणि त्याने ओत्रा-ळींत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांत आइारादि दार्ने द्यावीत. दुसरे दिवशी पूचा व दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे पांच बुधवारी पूजाक्रम करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळी श्रीपंचपरमेष्ठी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चार प्रकारचीं दाने द्यावीत. दीन अनाथांना अभयदान द्यावे. पांच मिथुनांस भोजन करवून त्यांना वस्त्र, पान, सुपारी, सुंगधी तांबूल, साई चरक, हळद, कुंकु वगैरे देऊन त्यांचा सन्मान करात्रा. २५ चैत्यालयांचे दर्शन करावे असा या व्रताचा पूर्णत्रिधि आहे.
हे व्रत पूर्वी ज्यानीं पालन करून उत्तम गति प्राप्त करून घेतली आहे त्यांची कथा येथे सांगतों. ते कक्षपूर्वक ऐका –
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत हेमांग नामक एक मोठा विस्तीर्ण असा देश आहे. त्यांत राजनूर नांवाचे एक मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी सत्यंधर नांवाचा मोठा पराक्रमी, सदाचारी, गुणवान् असा एक राजा राज्य करीत होता. त्याला विजयादेवी नामक एक सुशील, सौंदर्यवती व गुणवती अशी पट्ट स्त्री होती. त्यांचा मंत्री काष्ठांगर व पुरोहित रुद्रदत्त यांच्यासह तो सुखानें कालक्रमण करीत होता.
सत्यंधर राजांस जीवंधर नामक एक सुंदर पुत्र होता. यानें आपल्या पूर्वीच्या सहाव्या भवांत है व्रत केले होते परंतु या व्रतावर त्याचा विश्वास नसल्या कारणानें आणि एका महामुनीश्वरांस आपल्या नगरांतून बाहेर हांकलून लाविले होते त्या योगाने आतां याच्या जन्मापूर्वीच पित्याचा वध झाला होतां आणि याला सोळा वर्षे देश व राज्य यांचा वियोग झाला. पुढे स्थाका पूर्व पुग्योदयाने सर्व राज्चर्य प्राप्त झाले, मग तो पुष्कळ दिवस राज्यसुख भोगून जिनदीक्ष। वेतां झाला. घोर तपश्चर्या करून सर्व कर्वांचा क्षय करून मोक्षास गेला आहे.