व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या शुद्ध किंवा कृष्ण पक्षांतील चतुर्थी दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावो आणि पंचमी दिवशीं प्रातःकाळीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगा वर दृढधीतवश्ले धारण करावीत. मग सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन मंदिरास जावे. तेथे गेल्यावर जिनालयास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापवशुद्धि वगैरे क्रियां पूर्वक श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग नमस्का करावा, नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीपंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापू त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर एका पाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यांवर पांच पाने मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फळे, फुडे वगैरे ठेवावीत. मग श्रीपंचपरमेष्ठींचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला ही म्हणत त्यांची आठ द्रव्यांनी पूजा करावी. पंचमक्ष्य पयसांचे चरु करून ते देवांस अर्पावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावो. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्या-यसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे धाळावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रस्त्राध्याय करावा. ही व्रतकथाहि वाचावी. एका पात्रांत पांच पाने मांडून त्यांवर आठ द्रव्ये आणि एक नारळ ठेवून महा करावा. आणि त्याने ओवाळोव तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा आणि दान करून आपण पारणें करावें, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याच क्रपाने महिन्यांतून एकदां अशा पांच पूजा पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीपंचपरमेष्ठी विधान करून महा-भिषेक करावा. चतुःसंघास आहारादि दाने द्यावीत. पांच मिथुनांस भोजन करवून वस्त्र, पान, सुगरी, फलें, पुष्पे सार्द्र चपक, केळीं, वगैरे देऊन त्यांचा सन्मान करावा. दोन अनाथांना अभयदान देऊन भोजन घालावे. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत पूर्वी जिनचंद्र राजानें आपल्या परिवारासह यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केले होते. त्यामुळ त्याला पुष्कळ राज्यैश्वर्य प्राप्त झाले. आणि त्यानें अनेक कृत्रिम व अकृत्रिम जिनचैत्य चैत्यालयांचे दर्शन करून दुर्घट असे वज्रकवाट उघडून धर्म प्रभावना केली. शेवटीं तो दिगंबर दीक्षा घेऊन समाधि विधीनें मरून स्वगौत देव झाला.तेथे चिरकाल पुष्कळ सुख भोगून पुढे मनुष्य सर्वात येऊन क्रमाने मोक्षास गेला आहे. अत्ता या बडाचा दृष्टांत आहे.