व्रतविधि – चैत्रादि बारा मांसांतील कोणत्यादि मासाच्या शुक्ल अथवा कृष्ण पक्षांतील चतुर्थी दिवशी या ब्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि पंचभो दिवशी प्रातःकाळों शुचि जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वर्षे धारण करावीत. नंतर सर्व पूजा सामग्रो आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांत भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादोन लावावा. श्रीपीठावर श्रीपंच-परमेष्ठी पतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा, देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पांच पाने मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फड़े फुले वगैरे ठेवावीत. नंतर पंचपरमेष्ठींचों अष्टके, स्तोत्रे व जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावी. पंचपक्क नांचे चह करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करात्रो. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावे. ॐ हीं अई अर्हत्तिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिन सहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावीं. मग एका पात्रांत पांच पाने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्ध करावा. आणि त्याने ओवाळीत तीन प्रद क्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे,