व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुक्ल पक्षांतील पंचमी दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि षष्ठो दिवशीं प्रातः काळीं शुचि जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौत वस्ने धारण करावींत मग सर्व पूजाद्रव्यें आपल्या हातीं घेऊन जिनाळ्यास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्त ने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीपद्मप्रभ तीर्थकर प्रतिमा कुसुमवर मनोवेगा यक्षयक्षी सहित स्थापून त्यांच्या पंचामृतांनीं अभि-बेक करावा. आणि एका पाटावर सहा स्वस्तिकें काढून त्यांवर सहा पार्ने मांडावींत. आणि गंधाक्षता, फलें, फुले वगैरे द्रव्ये ठेवावींत. त्यानंतर वृषमापासून पद्मप्रभा पर्यंत ६ तीर्थकरांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्ट द्रव्यांनीं पूजा करावी. पचपकान्नांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं श्रीपद्मप्रभ जिनेंद्राय कुसुमवरयक्ष मनोवेगायक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने. १०८ फुले घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा, श्रीजिन-सहस्रनाम स्तोत्र म्हणून श्रीपद्मप्रभ तीर्थकर चरित्र व धन्यकुमार चरित्र वाचावे. ही व्रतकथा वाचावो, मग एका पात्रांत सहा पार्ने लावून त्यांच्यावर अष्ट द्रब्बे व एक नारळ ठेवून महाब्र्व्य करावा. आणि त्यानें ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावींत. दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणें करावें. तोन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.