व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्यादि माप्ताच्या शुक्ल-पक्षांतील १० दिवशीं या व्रत धारकांनी ए भुक्ति करावी आणि एकादशी दिवशीं प्रातःकाळीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढभौत वर्षे धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य हातीं घेऊन मंदिरास जावे. तेथे गेल्यावर जिनालयास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापबशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीपंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर गंधानें पांच स्वस्तिकें लिहून त्यांवर पांच पार्ने मांडावीत आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फले, फुले वगैरे ठेवावीत. श्रीपंचपरमेष्ठीचीं अष्टके स्तोत्रे जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा करावी. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. पंचमध्य पदार्थांचे चरु करावेत. (पायस वगैरे) ॐ हीं अर्ह अर्हत्सिद्धा-चार्योपाध्याय सर्व साधुभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ सुवासिक फुळे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावी, मग एका पात्रांत पांच पानें लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्थ करावा. आणि त्याने ओवाळीत मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून धर्भध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणं करावे. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याच क्रमानें महिन्यांतून एकदां त्याच तिथीस है व्रत पूजन करावें. अशा पांच पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं त्याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीपंचपरमेष्ठो विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास आणि पांच मुनि संघांस आहारदान देऊन आवश्यक वस्तु शास्त्र, जपमाला, पिंछो, कमंडलु वगैरे द्याव्यात. तसेच आर्थिकांनाहि द्यावें. पांच मिथुनास भोजन करवून त्यांना वस्त्रे, फलें, पुष्पें, नारळ, पान सुपारी वगैरे देऊन त्यांचा सम्मान करावा. दोन अनाथ यांना अभय-दान देऊन जिनालयांत छत्रचामरादि आवश्यक उपकरणे ठेवावींत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
आतां है व्रत यथाविधि पालन केल्यामुळे पूर्वी ज्यांना सर्व सुखे प्राप्त झाली आहेत त्यांची कथा तुम्हांस सांगतो; ते तुम्ही शांत मनाने ऐका, –
– कथा –
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत पुष्कलावती नामक एक मोठा देश आहे. त्यांत पुंडरिकिणी नांवाचे एक अत्यंत रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी प्रजापालन नांवाचा एक मोठा शूर व न्यायवान् अता राजा राज्य करीत होता. त्याला गुणवती नामक एक पट्टस्त्री होती. तेथेच कुबेरमित्र नांवाचा एक राजश्रेष्ठो होता. व त्याला धनवती वगैरे ३० स्त्रिया होत्या. त्याची पुष्कळ धन संपचिहि होती. परंतु त्याला पुत्र संतान नसल्यामुळे तो श्रेष्ठी चिंताक्रांत होऊन राहतसे.
एके दिवशीं सर्व ऋद्धिसंपन्न चारणमुनीश्वर कुबेरमित्र राजश्रेष्ठोच्या घरासमोर आले. तेव्हा त्या श्रेष्ठीने त्यांचे यथाविधि प्रतिग्रहण करून त्यांना आपल्या घरी नेले. आणि नवधामक्तीने आहारदान दिले. त्यांचा निरंतराय आहार झाल्यावर ते मुनीश्वर तेथेंच एका आसनावर बसले. तेव्हां त्या श्रेष्ठोने त्यांच्या मुखे कांहीं धर्मोपदेश ऐकल्यावर आपले दोन्ही हात विनयाने जोडून त्यांना म्हटलें, – हे ज्ञानसागर स्वामिन् ! आपल्या कृपाप्रसादाने मला सर्व धनसंपत्ति प्राप्त झाली आहे. पण पुत्रसंतति नसल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त होऊन राहिलों आहोत. तेव्हां आतां आम्हांस पुत्रसंतति होईल किंवा नाहीं हैं सांगावे. हे त्याचे नम्र भाषण ऐकून ते मुनीश्वर त्याना म्हणाले, हे भव्य श्रेष्ठीन् ! आतां तुम्हांस मोठा दैत्रशाली पुत्र होणार आहे. त्या करितां तुम्हीं कुबेरकांत हे व्रत पालन करावे म्हणजे त्यायोगें तुमची सर्व लालसा पूर्ण होईल. असे म्हणून त्यांनी त्या ब्राचा काल व विवि सांगून दिला. ते ऐकून सत्रास मोठा आनंद झाला. मग त्या श्रेष्ठोनें त्या मुनीश्वरांना प्रार्थना करून ते व्रत स्त्रोकारिलें, त्या नंतर ते नुनोश्वर त्यांना शुभा-शिर्वाद देऊन आकाशमार्गे निघून गेले.
इकडे त्या कुवेरमित्र श्रेष्ठोनें ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले. त्यायोगें पुढे त्यांना कुबेरकांत या नांवाचा एक मोठा भाग्यशाली पुत्र झाला. पुढें पुष्कळ काल संसारसुख भोगून त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो तपोवनांत गेला. तेथे एका निग्रंथ मुनीपाशीं दिगंबर दीक्षा घेऊन घोर तपश्चरण करूं लागला. कांहीं दिवसांनी त्या तप प्रमावाने अंतीं समाधि विधीने स्वर्गात महर्द्धिक देव झाला. तेथे तो चिरकाल पुष्कळ सुख मोगू लागला. आयुष्यांती तेथून च्यवून उत्तम कुलीं जन्म घेऊन क्रशने मोक्षास गेला आहे. असे या व्रत्वाचे माहात्म्य आहे.