या जंबूद्रोपांतील भरतक्षेत्रांत आर्य खंड आहे. त्यांत कुंथल कर्नाटक नांवाचा एक मोठा विस्तीर्ण देश आहे. त्यामध्ये करवीर नामक एक मोठे रपणीय नगर आहे. तेथे पूर्वी गंजदित्य नामें एक मोठा पराक्रमी, गुणवान् व न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. रुणला शीलवती नामक रूपवति, गुणवति व सुशील अशी पट्टस्त्री होती. त्यानां गुणवंत या नांवाचा एक मोठा भाग्यशाली पुत्र होता. तसेच निवसावंत नांवाचा एक बुद्धिमान् प्रधान होता. याशिवाय पुरोहित, राजश्रेष्ठो, सेनापति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह तो राजा सुखाने राज्य करीत होता.
तेव्हां एके दिवशीं त्या नगराच्या उत्तरमागर्मी असलेल्या बहिरु-बानांत श्रीमाणिक्यनंदी नामक महामुनि विहार करीत येऊन उत्तरले. हैं शुमवृत्त त्या राजास कळतांच तो आपल्या परिजन व पुरजन यांच्यासह पादमार्गे त्या मुतोश्वरांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्यांना तीन प्रदक्षिणापूर्वक वंदनादि करून त्यांच्या सन्निध जाऊन बसला. त्यावेळीं त्या मुनीश्वरांच्या मुखानें कांहीं वेळ दयाधर्माचा उपदेश श्रवण केल्यावर मोठ्या विनयाने आपले दोन्ही कर जोडून त्या मुनीश्वरांस तो म्हणाला, हे दीनदयाधन स्वामिन् ! आतां आपण आम्हांस जिनदत्तराय यांची कथा निवेदन करावी, हे त्याचे नम्र भाषण ऐकून ते सम्यग्ज्ञानसंपन्न मुनिराज त्यांला म्हणाले, -हे भब्य राजन् ! आतां तुम्हांस जिनदत्तरायाची कथा सविस्तर निरूपण करितों; ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, उत्तर मथुरा म्हणून एक सुंदर पट्टण आहे. तेथे साकार या नांवाचा एक मोठा शूर व नीतिमान् असा राजा राज्य करीत होता. त्याला श्रियाळदेवी नाने सौंदर्यवति व सुशोल अशी पट्टस्ती होती. त्यांना तीन सुंदर कन्या होत्या. परंतु त्यांना पुत्रसंतति मात्र नव्हती. शिवाय त्याला मंत्रो, पुरोहित, राजश्रेष्ठी व सेना-पति वगैरे पुष्कळ परिवारजन होते. यांच्यासह तो सुखार्ने कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं त्या नगराच्या श्रीजिनालयांत सिद्धांतकीर्ति नामक दिगंबर ज्ञानी महामुनि आले. ही शुभ वार्ता राजांस कळांच तो आपल्या परिजन व प्रजाजन यांच्यासह त्यांच्या दर्शनार्थ सर्व पूजा सामी बरोबर घेऊन त्या चैत्यालयांस गेला. तेथे गेल्यावर त्याने मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेश्वरांस मक्तीनें साष्टांग नमस्कार केला. आणि तो भगवंतांची विधिपूर्वक पूजा करून सभामंडपांत आला. आणि त्या सिद्धांतकीर्ति मुनीश्वरांची वंदना, पूजा, स्तुति करून त्यांच्या समीप जाऊन बसला. मग त्यांच्या मुखाने कांहीं वेळ तत्त्वोपदेश श्रवण केल्यावर ती श्रियाळदेवी राणी मोठ्या विनयाने आपले दोन्ही हात जोडून त्या मुनीश्वरांत म्हणाली, हे ज्ञानसागर भवसिंधुतारक मुनिवर्य ! आतां मला पुत्र संतति होईल की नाही हे आपण कृपा करून सांगावें. हे तिचे विनयपूर्ण वचन ऐकून ते मुनिराज तिला म्हणाले, हे कन्ये ! आतां तुमच्या पोटीं सम्यक्त्वचूडामणि व मोठा भाग्यशाली पुत्र होणार आहे. पुढे तो स्वतंत्रपणे राज्य करील. या करितां तुम्ही आतां जिन-दत्तरायव्रत (सर्व कामित्रप्रद ब्रत) हे पालन करा. आतां तुम्हांस त्या व्रताचा काल व विधि यथास्थित कथन करितों. तें तुम्ही एकाग्र चित्तानें ऐका, –
व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्ल-पक्षांतील प्रथम गुरुवारी या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि दुसरे दिवशीं म्हणजे शुक्रवारी प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्त्रे घारण करावींत. मग सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापवशुद्धिर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, देवापुढे नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीसुपार्श्वनाथ तोर्थंकर प्रतिमा नंदिविजब कालो यक्ष यक्षी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर गंधाने सात स्वस्तिकें काढून त्यांवर सात पार्ने मोडारींत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फळे, फुले वगैरे द्रव्ये ठेवावीत. आणि वृषभापासून सुपार्श्वनाथापर्यंत साप्त जोयेकरांची अष्टके, स्तोत्रे जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावी. पंचभक्ष्यपायसांचे चरु करावेत. त्यानंतर श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, ॐ ह्रीं अर्हं श्रीसुपार्श्वनाथाय नंदिविजय काली यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुणे घालार्थीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळा जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून सुपार्श्वनाथ चरित्र आणि ही व्रतकथाहि वाचावी. मग एका पात्रांत सात पाने मांडून त्यांच्यावर अष्टद्रव्य व एक नारळ ठेवून महार्घ्य करावा. आणि स्याने ओवाळीत मंदिरास तीन पदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहा-‘रादि दानं द्यावींत. आणि दुसऱ्या दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे हे व्रतपूजन सात शुक्रवारी करून शेवटों याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीसुपार्श्वनाथ विधान करून महाभिषेक करावा. सात-मुनींना आहार देऊन त्यांना शास्त्र, श्रुतवर्षे, जयमाळा, वगैर आवश्यक वस्तू द्याव्यात. तसेच आर्थिकांनाहि दाने द्यावीत. वेळवाच्या नऊ करंडकांत नारळ, पान, सुप री, गंधाक्षता, फुल नऊ प्रकारचीं फळे, करंज्या वगैरे पदार्थ आणि एकेक मोती व खण घालून नऊ वायर्ने तयार करून देवापुढे ठेवावीत, त्यांतून एक सरस्वतीपुढे व एक पद्मावतीपुढे ठेवून बाकीची सात घरी न्यावीत. आणि सात सुवासिनीजियांत भोजन करवून त्यांना तीं वायने द्यावीत. श्रावक श्राविकांना भोजन द्यावे. दीन, अनाथ यांना अभयदान द्यावे. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
जे भव्य स्त्रीपुरुष याचे यथाविधि पालन व उद्यापन करि-तात त्यांना ऐहिक व पारलौकिक सर्वे इष्ट संपत्ति प्राप्त होऊन क्रभाने नंीं मुक्तिसुखही अवश्य प्राप्त होतें. असा या व्रताचा प्रभाव आहे.
हे सर्व त्या सिद्धांतकीर्ति मुनीश्वरांच्या मुखाने ऐकून त्या थियाळदेवी वगैरे समस्त जनांस अतिशय आनंद झाला. मग तो साकार राजा व श्रियाउदेवी राणो यांनी सिद्धांतकीर्ति मुनीश्वरांप्त भक्तोने प्रणिपात करून है जिनदत्तराय व्रत (सर्व कामितप्रद व्रत ) अइण केले. नंतर ते सर्वजन त्या मुनीश्वरांना नमोस्तु करून आपा-पल्ल्या गृहीं गेले.
पुढे कालानुसार त्या राजाराणींनीं है व्रत यथाविधि पाळून याचे उद्यापन केले. नंतर त्या श्रियाळ देवोस गर्म राहिला. नऊभास पूर्ण झाल्यावर तिला पुत्ररल प्राप्त झाले. त्याचे जातकर्म व नामकर्म विधि करून त्या बालकाचे नांव ‘जिनदत्तराय’ असे ठेविलें. नंतर तो बालक शुक्लपक्षांतील चद्राननाणे वृद्धि पावत सर्व विद्येत निपूण होऊन तारुण्यावस्थेत आला.
एके दिवशीं साकार राजा वनांत एका मुनीश्वरांकडे गेला. आणि त्यांना मोठ्या भक्तीनें वंदना करून त्यांच्या समीप बसला. कांहीं वेळ धर्नेपदेश ऐकून आपले दोन्ही हात जोडून विनयाने त्यांना म्हणाला, हे ज्ञानसागर स्वामिन् ! मी शत्रु राजावर विजयासाठीं देशांतरी जाणार आहे. त्यांत मला यश मिळेल कीं नाहीं है कृपा करून सांगावं. हे त्याचे नम्र वचन ऐकून ते महाज्ञानी मुनीश्वर त्याला म्हणाले, हे भव्य नृपोत्तमा ! तुला ह्यांत (शत्रु विजयांत) यश येईल. परंतु परत येतांना तुझ्या कुलाला कलंक लागण्यासारखी
एक कृति तुझ्याकडून घढेल. हे ऐकून त्याला सखद आश्वर्थ वाटले. मग तो राज्जा त्या मुनीश्वरांना नमोस्तु करून आपल्या नगरी परत आला. नंतर शुभ दिवशी शत्रु राजावर विजय मिळविण्यासाठीं सैन्यां-सह गेला. शत्रु बरोबर मोठ्या शौर्याने लढून त्यांत त्याने पूर्ण यश मिळविले, नंतर तो आपल्या नगराकडे परत निघाला. त्यावेळीं एका पर्वताच्या पायथ्याशीं एक बेरड लोकांचा गांव लागला. तेथून बेत असतांना एके ठिकाणीं भूमीवर भ्रमरांचा समूह जमला होता. ते पाहून राजास मोठे आश्वर्थ वाटले, तेव्हा तो आपल्या प्रधानास म्हणतो, -हे मंत्रीन् ! या ठिकाणीं इतके भ्रमर को जमले आहेत ? हे ऐकून तो मंत्री त्या ठिकाणीं जाऊन निरखून पाहूं लागला. तोंच तेथे ओलावा असून कमलासारखा वास येत होता. ते पाहून तो मंत्री राजांस म्हणाला-रे महाराज ! येथे कोठे तरी एक सुंदर पद्मोनी जातीची स्त्रो असली पाहिजे. कारण या ठिकाणीं तिने मूत्रोत्सर्ग केला आहे.
यासाठीं हे भ्रमर येथे जमले आहेत. हे त्यांचे भाषण ऐकून त्या साकार राजास त्या पद्मोनो खोराप्तिविषयीं अभिलाषा उत्पन्न झाली, तेव्हां तो त्या मंत्रीस म्हणाला, हे मंत्रीन् ! ती पद्मीनो खो कोठे आहे ? तिच्या प्राप्तिविषयीं शोध लावून ये. हे त्या राजाचे वचन ऐकून तो ‘प्रधान तेथील बेरड राजाच्या वाड्याकडे गेला. आणि त्याने चौकसी करून त्या पद्मोनी कन्येस पाहिले. आणि तिच्या पित्यास सर्व इकिगत सागून तो त्याला आपल्या राजाकडे घेऊन आला. आणि मंड्याने आपल्या राजांस सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हां तो साकार राजात्या बेरड राजांस म्हणतो, हे नृपा! तूं आपली कन्या लग्न करून द्यावी. हे ऐकून तो बेरड राजा त्यांना म्हणतो, हे नृपश्रेष्ठा ! आपण उच्चकुलींचे क्षत्रिय राजे आहांत. मी हीन जातींच्या बेरड लोकांचा अधिपति आहे. तेव्हां आपल्या सारख्या श्रेष्ठ कुलाच्या राजांनी मज सारख्या नीच कुलांच्या राजकन्येशी विवाह करणे योग्य दिसत नाहीं,
वगैरे त्यानें पुष्कळ रीतीने समजावून सांगितलें. तथापि तो साकार राजा त्या पद्मीनी कन्येविषयीं अत्यंत भ्रांत चित्त व आतुर झाल्यामुळे तो तिला करून घेण्याविषयीं दुराग्रह धरून बसला. तेव्हां तो बेरड राजा त्यांना म्हणतो- हे राजन् ! जर आपण माझी कन्या करून घेण्यास तयार असल्यास मीही देण्यास तयार आहे. परंतु माझ्या कन्येच्या पोटीं जी पुत्र संतति होईल, ‘तिला आपण राज्यभार दिला पाहिजे.’ हे त्याचे म्हणणे त्या साकार राजाने कबूल केले.
मग त्याने त्यांना आपल्या वाड्यांत बोलावून नेले. आणि मोठ्या समारंभाने त्यांचा आपल्या पद्मोनी कन्येशीं विवाह केला.
नंतर कांहीं दिवसांनी तो साकार राजा आपल्या त्या पद्मीनी सुंदरीस बरोबर घेऊन आपल्या नगरी परत आला. आणि एक उत्तम गांवाबाहर महाल बांधवून त्यांत त्या पद्मोंनी प्रियेस नेऊन ठेविले. आणि आपण मात्र आपल्या राजवाड्यांत राहूं लागला.
मात्र त्या पद्मोनी श्रीस आणल्यापासून ती श्रियाळदेवी राणी ही अत्यंत चिंताग्रस्त होऊन शोक करीत बसू लागली दें पाहून राज्जा तिच्याजवळ जाऊन तीस म्हणतो, हे माणप्रिये ! तुझ्या पुत्रास मी राज्याधिकार देतो. तूं चिंता करूं नको. हे त्याचे वचन ऐकून ती स्वस्थ राहिली.
पुढे कालांतराने ती पद्मोनो गर्भवती होऊन पुत्ररत्न प्रसूत झाली, त्या बालकाचे मारीदत्त असे नांव ठेविले. मग तो राजा अत्यंत आसक्त होऊन तिच्या जवळच राहूं लागला. पुढे राजा व ती पद्मीनी यांनी त्या जिनदत्तरायांस ठार मारण्याचा बेत केला.
एके दिवशीं त्यांनी आपल्या पाकगृहांत असलेल्या विश्वासू स्वयंपाक्यास सांगितळे कीं; येथे जो मुलगा हातांत लिंबू घेऊन येईल त्याला तूं शस्त्रानें ठार मार. असे सांगून त्या जिनदत्तरायाच्या हातांत लिंबू देऊन, एवढा त्या स्वयंपाक्याजवळ देऊन ये असे सांगून त्याला पाठविले. तेव्हां तो जिनदत्तराय लिंबू घेऊन मागर्गातून जात असतां, मध्ये त्याला मारीदत्त कुमार भेटला, तेव्हां तो त्यास म्हणाला, दादा तू इकडे कोठे निघाला आहेस! हे ऐकून तो त्यांस म्हणाला, हे कुमारा । मी लिंबू स्वयंपाक्यास पोंचविण्यासाठीं चाललों आहे तेव्हां मारीदत्त त्यांस म्हणाला, हे दादा! मीच लिंबू त्यांस पोचवून येतो, माझ्याजवळ था. असे म्हणून तो मारीदत्त लिंबू घेऊन त्या पाक गृहांत गेला. तेव्हां ठरल्याप्रमाणे त्या स्वयंपाक्यानं त्यांस ठार मारिले.
इतक्यांत तो साकार राजा व त्याची प्रिय पद्मोनी हे दोघे स्नान करून पाकगृहांत आले. आणि एकांतांत त्या स्वयंपाक्याला गुप्त वृत्तांत विचारला. तेव्हां त्याने ती सर्व इकिगत यथार्थ सांगितली. मग आपल्या मारीदत्त पुत्रास भोजनास बोलावणेसाठीं सेवकाला पाठविले. आंत जाऊन पाहतात तोच त्या मारीदत्ताचे प्रेत त्यांच्या दृष्टीं पढले. ते पाहून दोघांना अत्यंत दुःख झाले. तेव्हां त्यांना आपल्या दुष्ट कृत्या-बद्दल अत्यंत पश्चाताप झाला. परंतु त्यांबी दुष्ट बुद्धि नष्ट झाली नाहीं.
इकडे त्या जिनदत्तराय राजपुत्रांस आपला पिता व आपली सापत्ने माता या उभयांचे कपट वृत्त कळून आले. तेव्हां ती श्रियाळ-देवी आपल्या जिनदत्तराय पुत्रासह सिद्धांतकीर्ति मुनीश्वरांकडे गेली. आणि त्यांना मोठ्या भक्तीने वंदना वगैरे करून त्यांच्या समीप बसली. कांहीं वेळाने आपले दोन्ही हात विनयाने जोडून त्या मुनी-श्वरांना म्हणाली, हे दीनदयाधन स्वामिन् ! आतां आपण मला माझ्या पुत्राची भावी स्थिती पूर्णपणे कथन करावी. हे तिचे नम्र वचन ऐकून ते मुनीश्वर तिला म्हणाले, हे भव्य कन्ये ! आतां तूं तुझ्या पुत्रास या ठिकाणीं ठेवू नकोस. तुझ्या नवग्याने व पुत्राच्या सापत्न मातेने कोणत्याहि रीतीने तुझ्या पुत्राचा प्राण घात करावा असा दुष्ट विचार योजिला आहे याकरितां तूं आतां तुझ्या पुत्रास दक्षिणेकडे देशांतरी पाठीव, हे मुनीश्वरांचे वचन ऐकून त्याला अतिशय आनंद झाला. मग तो जिनदत्तराय राजपुत्र त्यांना नमोस्तु करून आपल्या राजवाड्यास आला. मग आपश्या मातेची माझा घेऊन राजगड्यांतील जिनालयास आला. आणि तो जिनेश्वरांस मोठ्या मक्तोने नमस्कारादि करून पद्मावती देवीची मूर्ति आपल्या पाठोस बांधून घेऊन एका वायुवेगी घोड्यावर बसून नगराबाहेर पडला. तेव्हां त्याच्या पित्यान पाठविलेले सैन्य लगेच त्याचा पाठलाग करीत होते. पण पद्मावतीचे मुख दिसतांच ते सैन्य बरेच मार्गे पडत असे. त्यामुळे ते कंटाळून जिन-दत्तराय न सांपडल्याने परत गेले. मात्र जिनदतराय मोठ्या वेगाने दक्षिण दिशेच्या मार्गाने एका भयंकर अरण्यांत आला. सायंकाळ झाल्यामुळे तो एका निर्गुडी झाडावर त्या पद्मावती देवीस ठेवून तेथेच खालीं झोपी गेला. तेव्हां तो पद्मावती देवी त्याच्या स्त्रमात येऊन त्यास म्हणाली, हे महाभक्ता ! भव्य राजपुत्रा ! येथून तू पुढे जाऊं नको. याच ठिकाणीं माझें मंदिर बांधून माझी स्थापना कर. आणि येथे आम रचना करून निवास कर. व त्यास हुमच असे नांव ठेत्र, वगैरे त्या देवीने त्यांस सांगितले. है शुभ स्वप्न पाहून तो जिनदत्तराय जागा झाला. आणि त्यानें देवीच्या आज्ञेपमाणे तेथे ग्राम रचना करून ‘हुमच’ असे त्याचे नांव ठेविलें. आणि त्याच झाडाखालीं मंदिर बांधवून पद्मावती देवीचो स्थापना केली. आणि तेथे आपल्या श्रियाळदेवी मातेस आणविले. भग त्याने वीरपांड्य राजाच्या एका सुंदर कन्येशीं मोठ्या उत्सवानें विवाह केला. नंतर आपल्या परिवारासह तो सुखानें राज्योपभोग भोगूं लागला पुष्कळ काल सुख भोगू लागला
ही कथा श्रओमाणिक्यनंदी महामुनीश्वरांच्या मुखानें ऐकून त्या गेडादित्य राजादि समस्त जनांसं अतिशय आनंद झाला. पुनः राजार्ने त्यांना असा प्रश्न केा कीं; हे ज्ञानसिधो मुनीराज ! या नगराच्या बाह्य वनांत सातशे सत्तर निमेष मुनि अग्नीनें दग्ध होऊन मेले याचे कारण काय हा त्याचा प्रश्न ऐकून ते मुनिराज म्हणाले, या हुंडावसर्पिणो पंचमकाल दोषामुळे जिनधर्माचा नाश होत जाईल, जिनमुनि, जिनप्रतिमा, जिनमंदिर यांचा लोप होत जाईल. (बांचा ग्हास होत जाईल.)
या दोषाच्या परिहारार्थ तुम्ही सातशे सत्तर जिनमंदिरें बांधवून तितक्याच जिनप्रतिमा निर्माण कराव्यात. आणि त्यांची पंच-कल्याण पूर्वक प्रतिष्ठा करावी. तसेच ७७० निर्भयमुनि बनवावेत आणि तुम्ही (सर्व कामितपद बत) जिनदत्तरायव्रत यथाविधो पाळून त्यांचे उद्यापन करा. असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा काल व सर्वविधी सांगून दिला. मग तो गंडादित्य राजा, निंचसावंत मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापति वैगैरे लोकांनी त्या माणिक्यनंदी मुनीश्वरांस मार्थना करून ते व्रत व श्रावकांचोहि सर्व ब쿰 घेतली. नंतर सर्वजन त्यांना मक्तीनें पुनः पुनः नमोस्तु करून आपल्या करवीर नगरी परत आले.पुढे कालानुसार त्या गंडादित्य राजादि समस्त जनांनीं ते व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केके, त्या व्रताच्या पुण्याईने ते सर्व जन आपापल्या योग्यतेप्रमाणे सद्गतीस गेले. असा याचा प्रभाव आहे.