व्रतविधि – चैत्रादि बारा महिन्यांतून कोणत्याहि मासाच्या शुक्ल-पक्षांतील ४ दिवशीं या व्रत धारकांनी एकमुक्ति करावी. आणि ५ दिवीं प्रातःकाळीं शुचिजलाने स्नान करून अंगावर दृढ धौत वस्ने धारण करावींत. मग सर्व पूजाद्रव्ये आपल्या हातीं घेऊन जिनालयांस गमन करावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापथ-शुद्धयादि क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास मंक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. नंतर मूलनायकाच्या पीठावर श्रीपंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. मग एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पांच पाने मांडून त्यांच्यावर गंधाक्षता, फले, पुष्पें वगैरे ठेवावींत. आणि पंचपरमेष्ठींचीं अष्टके, स्तोत्रे व जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावो. पंचपक जांचे चरु करावेत. नंतर श्रुत व गुरु यांचो अर्चना करावो. व यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे पूजन करावे. ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसा