व्रतविधि – भाद्रपद शु. ८ दिवशीं या ब्रतिकांनों प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्वपूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे मंदिरास तीन पद-क्षिणा देऊन ईर्यापबशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादोप लावावा. पीठावर चतुर्विशतितीर्थकर प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. या प्रमाणें प्रत्येक प्रहरी अभिषेक पूजा करावी, नतर श्रुत्त व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं वृषभादिचतुर्विंशतितीर्थंकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्ने घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारतो करावी. त्यादिवशीं उपवास करावा. सत्पात्रांस दान द्यावे. रात्रीं धर्मध्यानपूर्वक जागरण करावें, दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे,
याप्रमाणें सोळा वर्षे पूजा करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं चतुर्विशतितीर्थंकराराधना करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावीत. १६ मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सम्मान करावा, असा याचा पूर्ण विधि आहे.
-कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड असून त्यांमध्यें सोरठ नांवाचा देश आहे. (हल्ली ज्याला सौराष्ट्र, काठेवाड म्हणतात.) त्यांत द्वारका नांवाचे एक पट्टण आहे. तेथे पूर्वी कृष्ण नववा नारायण राज्य करीत होता. त्याचो पट्टराणी सत्यभामा होती. तिच्यावर नारदानें सक्ती-मत्सर उत्पन्न करण्यासाठीं व सत्यभामेचा अपमानास्तव रुक्मिणी नांवाची सुंदर पट्टनो कृष्णास केली. पुढें एकदां श्रीनेमिनाथ तीर्थ-करांना केवलज्ञान प्राप्त झाल्यावर श्रीकृष्ण आपल्या राण्या व पुरजन आणि परिजन यांच्यासह वर्तमान त्यांच्या दर्शनासाठीं समवसरणांत गेले. भगवंतांना नमस्कार तीन प्रदक्षिणापूर्वक करून त्यांनी त्यांची पूजा, स्तुति केलीं. मानव कोष्ठांत बसून काहीं वेळ धर्मोपदेश श्रवण केला. नंतर कृष्णानें रुक्मिणीचे भवांतर मोठ्या विनयानें विचारिलें. तेव्हां भगवंतांनी सांगितले कीं; – मगध देशांत राजगृह नांवाचे एक नगर आहे. तेथे पूर्वी लक्ष्मीमति नांवाची एक ब्राम्हणीण राहात होती. एके दिवशीं एक मुनिराज चर्ये नमित्त नगरामध्ये आले. ते अत्यंत क्षोणशरीरी होते. त्यांना पाहून या लक्ष्मीमतीनें फार निंदा केलो. आणि दुर्वचन बोलून त्यांच्या अंगावर थुंकली. या दुष्कृतीमुळे तिला तिर्यंचायु बंध पडला, आणि कुष्ठरोगदि जडला. आयुष्यावसानीं ती मरून मोठ्या कष्टाने म्हैस झाली. नंतर मरण पावून डुक्रीण झाली. मग पुनः कुत्री झाली. त्यानंतर धीवरीण झाली, मासे मारून
आणून आपली उपजीविका करूं लागश्री.
एके दिवशीं एका वडाच्या वृक्षाखालीं एक मुनि ध्यानस्थ बसले होते. त्यावेळीं ती कुरूपी दुष्ट पापी धीवरीण जाळे घेऊन तेथे आली आणि नदींत मासे पकडण्यासाठीं जाळे टाकून बसली. ते पाहून मुनींनीं तिला त्या दुष्ट कार्यापासून सोडवून म्हटले हे कन्ये ! तू पूर्वीच्या पारामळे अशी दुःखी, कष्टी झाली आहेस. आणि आतांहि असे पाप करूं लागलीस तर तुला दुर्गति होईल, असे म्हणून त्यांनीं तिचे सर्व भवांतर सांगितले. ते ऐकून तिला मूर्च्छा आली. मग सावध होऊन ती त्यांना म्हणाली, हे गुरुनाथ या पातकांपासून सुटण्याचा कांडी उपाय असल्यास तो सांगावा. तेव्हां ते म्हणाले, – सम्यग्दर्श-नासह बारा व्रते धारण कर, वगैरे उपदेश त्यांनी तिला दिला. मग तिने तीं धारण केलीं. आयुष्यांतर्ती समाधिविधीने मरून या दक्षिण देशांत सुपारा नगरांतील नंद श्रेष्ठोच्या नंदा श्रेष्ठिणीच्या उदरीं सुंदर लक्ष्मोमती नांवाचो कन्या झाली. तो सौंदर्यवतो होती. तथापि अशुभआचरणामुळे सर्व लोक तिचो निंदा करीत असत.
एकदां त्या नगराच्या उपवनांत नंद नांवाचे मुनीश्वर येऊन उतरले. हो वार्ता नगरांत कळतांच राजादि समस्त जन त्यांच्या दर्श-नासाठी गेले. त्रिप्रदक्षिणापूर्वक पूजा, वंदनादि करून त्यांच्या समीप बसून धर्मोपदेश ऐकू लागले. शेवटीं नंद श्रेष्ठोनें विचारले कीं, हे दोन दयाघन स्वामिन् ! ही माझी कन्या रूपवती असूनहि अशुम लक्षणांनी युक्त कां आहे? ज्यायोगें सर्व लोक इची निंदा करतात. तेव्हां ते महाराज म्हणाले, – इर्ने पूर्व जन्मांत मुनोश्वरांची निंदा केली आहे. त्यायोगें ती म्हैस, डुकरीण, कुत्री आणि घीवरीण इत्यादि होऊन दुःख भोगली आहे. पंचाणुव्रतादि बारा व्रतै पाळलीं म्हणून आतां तुझी पुत्री होऊन जन्मली आहे. आतां जर इने सम्यक्त्वपूर्वक निःशुल्याष्टमीत्रत पाळले तर निःसंशय या पापापासून मोकळे होईल. असें म्हणून त्यांनी तिला त्याचा सर्वविधि सांगितला. ते सर्व ऐकून त्यांच्या जवळ त्या लक्ष्मीमतीनें है व्रत ग्रहण केले. आणि कालानुसार त्याचे पालन केले व शेवटीं शीलश्री आर्थिकेजवळ दीक्षा आणि समाधि मरण साधून सोळाव्या स्वर्गात देवी होऊन जन्मली. तेथे ५५ पल्य नानाप्रकारचे भोग्यैश्वर्य भोगून आयुष्यावसानीं भीष्म राजाची रुक्मिणी नामक कन्या झाली आहे. आतां क्रमाने श्रीलिंग छेदून परमपदाला मोक्षाला जाईल.
यापमाणे रुक्मिणी राणोर्ने मत्रांतर ऐकून या संसाराविषयी विरक्त होऊन आनंदानें श्री राजमती आर्थिकेजवळ दीक्षा घेतली. तपश्चर्या करून अंत समयीं ती समाधि मरण साधून स्वगौत देव झालो. तेथून च्पवून मनुष्यमव पावेल. अशा प्रकारें रुक्मिणोर्ने व्रत-तप-फलाने आपल्या भवांतराच्या पातकांचा नाश करून उत्तम पद मिळविले.