व्रतविधि – चैत्र, वैशाखादि द्वादश मासांतील शुक्ल व कृष्ण पक्षामध्ये ज्या ज्या दिवशी ज्या ज्या समयों चोवोस तीर्थंकरांचों गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान आणि निर्वाण कल्याणिके झाली असतील त्या त्या दिवशी त्या त्या कालीं है व्रत पूजन करावे. तेव्डों या व्रत धारकांनी (ह्या ब्रतपूजेच्या आदल्या (पूर्व) दिवशीं एकभुक्ति करावो, आणि त्या दिवशीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्त्रे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य आपश्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे मंदिरांस तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावांबा, श्रीपीठावर (मूलनायकाच्या पीठावर ज्या तीर्थंकराचे कल्याण-काल-पूजा असेल त्या तीर्थंकराचो प्रतिमा यक्ष, यक्षोसह स्थापून तिचा पंचामृतांनों अभिषेक करावा. ज्यावेळी हीं पंचकल्याणिके प्रत्यक्ष झाली, त्यावेळीं सौधर्मेंद्र स्वतः आपल्या चनुर्णिकाय देवांच्या परिवारासह येऊन पूआमहोत्सव करून गेला असल्याने त्या तिथी व कालपूजा मानवी पाण्यास अस्यंत पूज्य झाल्या आहेत. तसेच अरिहंत हे मंगल, लोकोत्तम व शरण जाण्यास उचित असल्यामुळे अत्यंत श्रेयस्कर आहेत. स्पा कारणाने स्यांच्या गर्भादि पंचकल्याणतियो मान्य लाहेत. बास्तव त्या दिवशी भाविक श्रावक श्राविकांनी जिनदूजा सत्पात्रदानादि पुण्यकर्मे करून पुण्य संपादन करावें, आणि अष्टद्रव्यांनी त्याचो अर्चना करायो. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव याचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं (या ठिकाणों कोणत्या तीर्थंकराचे कल्याणिक असेल त्याचे नांव घालावे.) तीर्थंकराय गोमुखयक्ष चक्रेश्वरी यधीसहिताय (येथे ज्या त्या तीर्थकरांच्या यक्ष, यक्षी यांची नांवे घालावीत.) नमः स्वाहा। या मंत्राने १०८ पुष्ये बाळाचीत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप एक करावा. हो व्रत-कथा वाचावी, नंतर कोणते कल्याणिक असेल त्याचे [ प्रवबन करायें] मनन करावे. प्रकृत तीर्थकर चरित्र वाचावे. मग एक महाच्ये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ‘मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करावा. सयात्रांत आहारादि दाने द्यावींत. दुसरे दिवर्शी पूजा व दान करून आपण पारणे करावें.
याप्रमाणे प्रत्येक मासीं जितकी कल्याणिके येतील जितक्या पूजा व उपवास करावेत. बारा महिन्यांत मिळून अशा एकंदर चोवीस तीर्थ-
करांच्या एकूण १२० एकशें बीस पूजा व उपवास होतात. त्यानंतर (एक वर्ष पूर्ण झाल्यावर) शेवटी याचे उद्यापन करावें. त्यावेळीं नूतन चोवीस तीर्थंकर प्रतिमा काणवून अथवा निर्माण करून पंचक-ल्याण विधिपूर्वक तिचो प्रतिष्ठा करावी, किंवा चतुर्विंशति तीर्थंकरारा-धनाविधान करून महाभिषेक करावा. आपल्या ऐपती प्रमाणे करावे, चतुःसंघास चतुर्विध दार्ने द्यावीत, असा याचा पूर्णविधि आहे.
– अगर –
प्रथमवर्षी ज्या ज्या मासांत ज्या तिथी दिवशी तीर्थंकरांची गर्भावतारकल्याणें येतील त्या त्या दिवशीं वरीक विर्धीत सांगितल्या
प्रमाणें पूजादि क्रम करावा. याप्रमाणे सर्व तीर्थंकरांच्या गर्भकल्याणि -काच्या व्रत किया कराव्यात.
द्वितीयवर्षी – ज्या ज्या महिन्यांत ज्या ज्या तिथी दिवशीं वृषभादि तीर्थंकरांची जन्मकल्याणें येतील त्या त्या तिथींच्या दिवशी वरील विधींत सांगितल्याप्रमाणे पूजादि क्रम करून जन्मकल्याणव्रत पालन करावे.
तृतीयवर्षी – ज्या ज्या मासांत ज्या ज्या तिथींच्या दिवशीं वृषभादि तीर्थंकराचो दीक्षाकल्याणें येत असतील त्या त्या तिथी दिवशीं पूर्ववत् पूजादि सर्व क्रम करून दीक्षाकल्याणत्रत पूर्ण करावे.
चतुर्थवर्षीः- ज्या ज्या महिन्यांत ज्या ज्या तिथींच्या दिवशीं वृषभादि तीर्थंकराचीं केवलज्ञानकल्याणें येतील त्या त्या तिथी दिवशी पूर्ववत् पूजादि विधि करून केवलज्ञानव्रत पाळावे.
पंचमवर्षीः- ज्या ज्या मासांत ज्या ज्या तिथीच्या दिवशीं वृषमादि तीर्थकरांची निर्वाणकल्याणें येतील त्या त्या दिवशीं पूर्ववत् पूजादि सर्व विधि करून निर्वाणकल्याणवत संपूर्ण करावे.
या प्रमाणे हे व्रत पांच ५ वर्षे यथाविधि करून शेवटीं पूर्ववत् उद्यापन करावे. असा याचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
श्रेणिक महामंडलेश्वर राजा चलना महाराणी यांचीच येथे घ्यावी.