व्रतविधिः- भाद्रपद शु. १२ दिवशीं या व्रतधारकांनीं एक- भुक्ति करात्री, आणि १३-१४-१५ या तीन दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून आपल्या अंगावर दृढधौत वले धारण करावीत. सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडपश्रृंगार करून वर चंद्रोपक बांधावें, देवापुढे शुद्धभूमीवर पंचवर्षांनीं रत्नत्रययंत्रदल काढून त्या सभोवती चतुरस्र पंचमंडले काढावींत. मध्यमागीं अक्षता घालून न्हीं कार युक्त स्वस्तिक काढावे. त्यावर श्वेतसूत्रवेष्टित सुशोभित कुंभ – ठेवून त्यावर एका ताटांत २९ पार्ने क्रमानें लावून अक्षता फलें, फुले वगैरे ठेवावींत. यंत्रदलाभोवती अष्टमंगलकुंभ व प्रातिहार्ये ठेवावीत पंचवर्णी दोरा व नूतनवस्त्र गुंडाळावे. नंतर श्रीपीठावर रत्नत्रय प्रतिमा आणि यंत्र यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. मग त्या पूर्वोक्त ताटांत मध्यमार्गी रत्नत्रय यंत्र व प्रतिमा आणून ठेवावी. त्यानंतर नित्यपूजाक्रम सर्व करून रत्नत्रयव्रतपूजाविधान करावे. सर्व बीजमंत्रानुसार आराधना करावी.
याच क्रमाने प्रत्येक दिवशीं तीनदां पूजाभिषेक करावा. या प्रमाणे तीन दिवस व्रतपूजाविधि व उपवास करावेत. नंतर भाद्रपद कृ० १ दिवशीं पूजाविसर्जन करावे. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. मग एकभुक्तिपूर्वक पारणे करावे, पांच दिवस ब्रह्मचर्यपूर्वक पंचाणुव्रते, तीन गुणत्रते, चार शिक्षात्रते पाळावीत. शास्त्रस्वाध्याय करीत ही व्रतकथाहि वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावीं.
असे हे व्रत तीन वर्षे पर्यंत करून अंतीं उद्यापन करावे. त्या समयीं नूतन रत्नत्रय प्रतिमा – अर, मल्लि-मुनिसुव्रत प्रतिमां यक्षय- क्षीसहित तयार करवून त्यांची पंचकल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. नाना- विध भक्ष्यांचे ३५ चरु करावेत. चतुःसंघास चतुर्विधदानें द्यावींत. तसेंच आवश्यक वस्तूंहि द्याव्यात. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे. असो.
– कथा –
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत सीता नदीच्या सीमेवर नील पर्वताच्या दक्षिणभागीं आणि विभंगा नदीच्या सीमेवर अस- णाऱ्या पद्मकूट नामक वक्षार पर्वताच्या मध्यभागीं कच्छ नांवाचा एक विशाल देश आहे. त्यांत वीतशोकपुर या नांवाचे एक रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी वैश्रवण नांवाचा एक मोठा पराक्रमी, नीतिमान्, असा राजा राज्य करीत असे. त्याला श्रीदेवी नामें एक अत्यंत सुंदर व गुणवती अशी पट्टराणी होती. हे हास्य विनोदाने राज्यसुखाचा उपभोग करीत होते.
एकदां त्या नगराच्या उद्यानांत सुगुप्ताचार्य हजारमुनि संघासह येऊन उतरले. हे शुभवृत्त वनपालकाकडून राजांस कळतांच तो शहरांत आनंदमेरी देऊन आपल्या परिजन पुरजन यांच्यासह वर्तमान मुनीश्वरांच्या दर्शनास पादमार्गे तेथे गेला. मग मुनीश्वरांना तीन प्रदक्षिणा देऊन मोठ्या भक्तीने साष्टांग प्रणाम करता झाला. कांही वेळ त्यांच्या मुर्खे दयाधर्माचा उपदेश ऐकल्यानंतर विनयाने आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, हे भव्यजन प्रतिपालक दयासिंधो स्वाभिन् ! आज आपण आम्हांस अनंतसुखाला कारण असे एकादें व्रतविधान निरूपावें. हे त्याचे नम्रवचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले, हे मव्योत्तम राजेंद्रा ! आतां तुम्हांस रत्नत्रय व्रत है पालन करण्यास अत्यंत उचित आहे. हैं बत जे पालन करतात त्यांना आत्मिक सुखसंपत्ति सहज रीतीनें मिळते. असे म्हणून त्यांनीं त्या व्रताचा सर्वविधि पूर्णपणे सांगितला. ते सर्व ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला. मग त्या वैश्रवण राजानें त्या सुगुप्ताचार्य महामुनीश्वरांस विनयानें प्रार्थना करून हे रत्नत्रय व्रत स्वीकारिले नंतर सर्वजन त्या मुनींना प्रणिपात करून आपल्या नगरीं परत गेले.
पुढे त्यांनीं यथाकाल हैं व्रत पाळून त्याचे उद्यापन केले. तो आपला काल धर्मकार्यातच सुखानें घालखूं लागला.
एके दिवशीं तो राजा आपल्या प्रधानासह वनक्रीडेसाठीं उपवनांत गेला होता. जातांना मार्गात एक शोभिवंत वटवृक्ष पाहिला होता. वनक्रीडा करून परत येत असतां त्या वटवृक्षावर अकस्मात् विद्युत्पात होऊन तो मोडून भस्म होऊन पडलेला दिसला. त्यामुळे त्याच्या मनांत या क्षणभंगुर संसाराविषयीं एकदम वैराग्य उत्पन्न झाले. नगरीं येऊन आपल्या पुत्राकडे राज्यकारभार सौंपवून आपण वनांत गेला. तेथे तो नागसेन निश्रथ मुनीश्वरासमीप दिगंबरदीक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागला. नंतर तीर्थकर नामकर्माला कारणीभूत सोळा मावना भावून समाधिविधोनें मरण पावून अपराजित स्वर्गात अहमिद्र देव झाला. तेथे बावीस सागर वर्षे दिव्य सुख भोगू लागला.
वंग देशामध्ये मिथिला नांवाची एक मनोहर नगरी आहे. तेथे पूर्वी कुंभसेन नांवाचा एक मोठा शूर, रूपवान्, गुणवंत व धार्मिक असा राजा राज्य करीत असे. त्यांना प्रभावती नामें अत्यंत लावण्य- वती, सुशील, सद्गुणी अशी पट्टराज्ञी होती. त्यांच्यासह तो सुखाने राज्यैश्वर्य भोगीत होता.
एके दिवशीं ती प्रभावती राणी आपश्या पतीसह प्रेमानें बिलास मंदिरांत मृदुशय्येवर निजली असतां, – त्या रात्रींच्या चौथ्या प्रहरी तिला स्त्रमामध्ये वृषभ, हत्ती, स्वर्गविमान, वगैरे शुभसूचक पदार्थ दिसले. तेव्हां अपराजित स्वर्गीय देव प्रमावतीच्या गर्भात येऊन अब- तरला. मग ती प्रातःकाळीं उठून शुचिर्भूत होऊन वस्नालंकारांनीं विभू- षित झाली आणि आपल्या पतिराजासमीप गेली. तेव्हां तिला राजाने अर्धासनीं बसवून घेऊन येथे येण्याचे कारण विचारिलें, मग तिने रात्रीं पडलेलीं सर्व स्वप्न त्यांना सांगून त्यांचीं फले विचारली. नंतर राजाने तिला असे सांगितले कीं; हे प्रिये ! तुला त्रैलोक्याधिपति सर्वगुण- संपन्न असा एक पुत्र होणार. बगैरे निरनिराळीं सोळा स्वप्नांचीं फले सांगितलीं, तीं ऐकून ती संतुष्ट होऊन आपल्या अंतःपुरांत निघून गेली. मग चतुर्णिकायदेवांनीं आपल्या अवधिज्ञानाने तीर्थकरांचा गर्मा- वतार झाला असे जाणून तेथे येऊन गर्भावतारकल्याण महोत्सव केला. गर्भात येण्यापूर्वी सहा महिनेपासून नित्य रत्नवृष्टि होतच होती. अशा प्रकारे नऊ महिने पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशीं तीर्थकरांचा जन्म झाला. मग चतुर्णिकाय देवांनीं त्या जिनबालकास ऐरावत हत्तीवर बसवून आकाशमार्गे मेरुपर्वतावर नेले. तेथे सुंदरशा रत्नस्वचित पांडुक शिळेवर बसवून क्षीरसमुद्राच्या जलानें त्यांचा अभिषेक केला. नंतर त्या जिनबालकाचे मल्लिनाथ असे नांव ठेवण्यांत आले. मग त्या बालकांस नगरी आणून प्रसूतिगृहांत पोचविले. आनंदनृत्य वगैरे करूने जिनबालकाचे जन्मकल्याण महोत्सव पूर्ण करून सर्व देव आपा- पल्ल्या ठिकाणीं निघून गेले. पुढे क्रमानें तो बालक शुक्लपक्षांतील चंद्रामनाणे वृद्धी पावू लागला व अन्य बालकांशी ही अनेक लीळा करूं लागला, मग तो यौवनावस्थेत माप्त झाला. तेव्हां कोणत्वादि योग्य निभिवाने या सेताराविषयी क्षणमंपुस्ता दिसून आल्यामुळे त्याच्या मनांत मबल वैराग्य उत्पन शार्के, हे लौकांतिक देवांत समजांच ते त्यांच्याजवळ येऊन त्यांनी त्यांची अनेक प्रकारे स्तुती करून धर्मोप- देशाने त्यांचे वैराग्य दृढ केले. नंतर चतुर्णिकाय देव येऊन त्यांनी पभूका पाललीत बसवून मोठ्या समारंभाने बनांत नेले. तेथे ममूंनीं एका शिळेवर बसून अंगावरील बखालंकार काढून “नमः सिद्धेभ्यः” या मंत्राचा उच्चार मुखाने करून पंचमुष्टो केशलोच केला. आणि दिगम्बर दोक्षा घेतली. नंतर देवांनी प्रभूची तीं वस्त्रामरणे व केश एका रत्नकरंड्यांत घालून समुद्रांत नेऊन सोडलें. अशा रीतीनें प्रभुंचा दोक्षोत्सव करून सर्व देव जयजयकार करीत आपल्या स्थानीं निघून गेले. प्रभू घोर तपश्चरण करूं लागले. तेव्हां तपःप्रभावाने त्यांना केवल- ज्ञान उत्सन झाले, मग चतुर्गिकाय देवांनी येऊन केवलज्ञानोत्सव केला. समवसरणाचो रचना केली. त्यासह पमूंनीं छप्पन्न देशांत विहार करून अनेक भव्य प्राण्यांना आपल्या दिव्य वाणीने धर्मामृत पाजविले. नंतर ते मल्लिनाथजिनेंद्र सम्मेदशिखरजीवर जाऊन तेथे एकांतस्थळीं बसून शुक्लध्यानाने सर्व अघातिकर्माचा क्षय करून मुक्तीस गेले. तेथे अनंतानंत काल शुद्ध चिदानंदस्वरूपाचा अनुभव घेऊं लागले.