३५ . पंचाणुव्रतकथा.
पंचाणुव्रतकथा. व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुक्ल पक्षांतील ८ दिवशीं व्रतपूजेस आरंभ करावा. सप्तमी दिवशी या व्रतिकांनी एकभुक्ति करावी आणि अष्टमी दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावीत. मग सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग…