२३. श्रीजिनगुणसंपत्तिव्रतकथा.
श्रीजिनगुणसंपत्तिव्रतकथा. व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्रप क्षांतील सप्तमी दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ अष्टमी दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ- धौतवस्त्रे धारण करावीत. आणि सर्व पूजाद्रव्यें हाती घेऊन जिनाल यास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथ शुद्धि वगैरे क्रियापूर्वक श्रीजिनेश्वरांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा….