(९१) कर्मदहन व्रतकथा.
कर्मदहन व्रतकथा. व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासांत शुभ दिवशीं या व्रतपूजनास पारंभ करावा. त्या दिवशीं प्रातः काळीं या व्रतधारकांनीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे घारण करावीत. आणि सर्व पूजासाहित्य आपल्या हातीं घेऊन श्रीजि- नालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर…