(६१) त्रिलोकभूषण व्रतकथा.
त्रिलोकभूषण व्रतकथा व्रतविधि– पौष शु. ३ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं शुचि जळाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धि वगैरे कराव्यात. नंतर श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्राणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर नवग्रह प्रतिमा व महावीर प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं…