(६) अनंतव्रतकथा
(६) अथ अनंतव्रतकथा व्रतविधि- भाद्रपद शु० १३ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं सुखोष्ण उदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बखें धारण करावींत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन चैत्यालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि बगैरे क्रिया कराव्यात. भक्तीनें श्रीजिनेंद्रास साष्टांग नमस्कार करून मंडप श्रृंगार करावा. यंत्रदळ काढून वरती चंद्रोपक बांधावें. देवापुढें शुद्ध भूमीवर पंचवर्णानीं…