( १२७) पर्वमंगल व्रतकथा.
पर्वमंगल व्रतकथा. व्रतविधि-वैशाख शु. १ ते ३ पर्यंत तीन दिवस या ब्रलि- कांनीं प्रासुक उदकानें तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतन धौतवले धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख यक्ष चक्रेश्वरी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना…