( १२६ ) मंगलभूषण व्रतकथा.
मंगलभूषण व्रतकथा. व्रतविधि – चैत्र शु. १ ते ३ पर्यंत तीन दिवस या व्रतिकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतनधीतवस्खें धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापयशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा, पीठावर आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख यक्ष व चक्रेश्वरी यक्षोसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्र-…