( १३६) दक्षिणायण व्रतकथा.
( १३६) दक्षिणायण व्रतकथा. व्रतविधि-श्रावण शु. १४ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. १५ दिवशीं प्रातःकाळी शुचि जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्थापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चंद्रमभ तीर्थकर प्रतिभा श्याम यक्ष व आलामालिनी यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची…